शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्यांकडून पै - पै वसूल करू

By admin | Updated: March 18, 2016 04:07 IST

हजारो कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी बँकांनी पाश आवळण्यास सुरुवात केल्यावर परदेशात निघून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सरकार ‘फरार’ मानते का, याविषयी

नवी दिल्ली : हजारो कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी बँकांनी पाश आवळण्यास सुरुवात केल्यावर परदेशात निघून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सरकार ‘फरार’ मानते का, याविषयी स्पष्ट भाष्य करण्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी टाळले. मात्र सरकारी बँका मल्ल्यांकडून थकीत कर्जांची पै न पै वसूल करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.एका कार्यक्रमात मल्ल्यांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली म्हणाले की, मल्ल्या यांच्या कंपन्यांनी थकविलेल्या कर्जांची वसुली असो अथवा त्यासंबंधीचा तपास असो, प्रत्येक संस्था नेटाने काम करीत आहे. वित्तमंत्री म्हणाले की, मल्ल्यांच्या प्रकरणाची तथ्ये अगदी सुस्पष्ट आहेत. प्रत्येक सरकारी संस्था त्यांच्यावर कडक कारवाई करील. बँका त्यांच्याकडून पै न पै वसूल करतील. मल्ल्यांच्या प्रकरणाने देशाच्या बँकिंग आणि खासगी क्षेत्राचीही बदनामी झाली असल्याचे मतही जेटली यांनी व्यक्त केले. वित्तमंत्री म्हणाले की,पोलाद, वस्त्रोद्योग, महामार्ग, पायाभूत क्षेत्रातील आर्थिक मंदी पाहता सरकार अनुत्पादक संपत्तीमुळे (बुडित कर्ज)निर्माण झालेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. वैयक्तिक पातळीवर कर्जाची मोठी रक्कम दिली जात असून अशा रकमेची परतफेड न करता काही लोक गैरवर्तन करताना आढळून येतात. त्यांच्याकडे पुरेशी सुरक्षा ठेव नसते, ही चिंतेची बाब आहे. कायदेशीर उत्तरदायित्वाखेरीज नैतिक आणि आचारणासंबंधी मुद्देही असतात, असे सांगून जेटली यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका बळकट होण्यासाठी सरकारला तातडीने पावले उचलण्याची गरज पाहता मी बँकांच्या पुनर्भांडवलीकरणावर भर देत आहे.‘किंगफिशर हाऊस’चा लिलाव बारगळलाबंद पडलेल्या मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या मुंबईतील ‘किंगफिशर हाऊस’ या मुख्यालयाच्या इमारतीचा लिलाव करून थकीत कर्जापैकी काही रक्कम वसूल करण्याचा बँकांचा प्रयत्न गुरुवारी फोल ठरला.स्टेट बँक आॅफ इंडियासह इतर सरकारी बँकांनी या कंपनीस दिलेले 6963कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. स्टेट बँकेच्या एसबीआय कॅप ट्रस्टीज या उपकंपनीने ‘सरफासी’ कायद्याचा आधार घेऊन २,४०१ चौ. मीटर क्षेत्रफळाचे ‘किंगफिशर हाऊस’ गेल्या वर्षी ताब्यात घेतले होते.स्टेट बँक कॅपने १५० कोटी एवढी राखीव किंमत ठेवून या इमारतीचा ई-लिलाव पुकारला होता. परंतु त्यात एकही बोली आली नाही.विजय मल्ल्यांनी आरसीबी सोडलीकर्जाच्या वादात अडकलेल्या विजय मल्ल्या यांनी इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आपल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आरसीबीने बीसीसीआयला मल्ल्या यांनी संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे पत्राद्वारे कळवले. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्चलाच आयपीएल संचालन समितीला आरसीबीचे अधिकारी रसेल अ‍ॅडम्स यांचा ई-मेल मिळाला होता. मल्ल्यांचे भारतात परतणे अनिश्चितचौकशीसाठी ईडीपुढे जातीने हजर होण्यासाठी एप्रिलपर्यंतची वेळ मागितल्याने मल्ल्या उद्या शुक्रवारी भारतात परत येण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. जबाब नोंदविण्यासाठी १८ मार्च रोजी जातीने हजर राहण्याचे समन्स मल्ल्यांना काढण्यात आले होते. परंतु समन्सनुसार आपल्याला उद्या शुक्रवारी हजर होणे जमणार नाही, असे मल्ल्या यांनी तपास अधिकाऱ्यास कळविले असून एप्रिलपर्यंतची वाढीव मुदत मागितली असल्याचे सूत्रांनी सांगितले.