शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा करू, आंदोलन मागे घ्या, सरकारची विनवणी; समिती नको, कायदे रद्द करा, शेतकरी आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:30 IST

आंदोलक अधिक आक्रमक; सरकारची सूचना फेटाळली, उद्या चर्चेची दुसरी फेरी

विकास झाडे

नवी दिल्ली : पाच जणांची समिती स्थापन करून शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करू. मात्र, त्याआधी आंदोलन मागे घ्यावे लागेल, ही केंद्र सरकारची सूचना फेटाळून लावत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी मंगळवारी दिला. चर्चेची दुसरी फेरी आता गुरुवारी, ३ डिसेंबर रोजी होणार आहे. 

शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या आग्रही मागणीसाठी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या नेत्यांशी मंगळवारी केंद्र सरकारने चर्चा केली. येथील विज्ञान भवनात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी पंजाब व हरियाणातील शेतकरी संघटनेच्या ३५ नेत्यांशी चर्चा केली. तीन तास चाललेल्या या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. कायद्यांचा विचारविमर्श करण्यासाठी एका समितीची स्थापना करू, परंतु त्याआधी तुम्हाला आंदोलन मागे घ्यावे लागेल, अशी अट या चर्चेवेळी केंद्र सरकारने पुढे ठेवली. मात्र, शेतकरी नेत्यांनी ती फेटाळून लावली. 

शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा सकारात्मक झाली. केवळ एका गटापुरती चर्चा मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांनाच त्यात सहभागी करून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. आम्ही त्यावर विचार करू. - नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री. 

केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत. गुरुवारी, ३ डिसेंबरला पुन्हा चर्चा होईल. त्यात काय ठरते ते पाहू.- जोगिंदरसिंह उग्रहण, अध्यक्ष, भारत किसान युनियन 

वेळ आलीच तर...केंद्र सरकार शेतीविषयक कायदे मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाही. परंतु शेतकऱ्यांकडून अधिक दबाव आला किंवा काही अघटित होण्याचे संकेत मिळाले तर नाईलाजाने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि बाजार समित्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर होऊ शकतो, असे सुत्रांनी सांगितले.

सर्वाधिकार शेतकऱ्यांकडेकेंद्राने शेतकरी संघटनांशी चर्चा केली असली तरी सरकारचे म्हणणे मान्य करण्याचे अधिकार संघटनांच्या नेत्यांकडे नाहीत. या नेत्यांना आंदोलक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार