शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी घोष यांचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? भाजपनं शेअर केला 'आदेश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 18:25 IST

सुकांत मजुमदार म्हणाले, कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी संदीप घोष यांनी पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भातील आदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील पोस्ट करण्यात आला आहे.

कोलकात्यातील आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर, देशभरात संतापाचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यातच, पश्चिम बंगाल भाजप प्रमुख सुकांत मजूमदार यांनी गुरुवारी आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठा आरोप केला आहे. 

सुकांत मजुमदार म्हणाले, कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी संदीप घोष यांनी पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भातील आदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील पोस्ट करण्यात आला आहे.

असे केले आरोप? -बंगाल भाजप प्रमुख सुकांत मजुमदार यांनी आरोप केला आहे की, माजी प्राचार्याने बलात्कार प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी सेमिनार हॉलजवळ नूतनीकरणाचे आदेश दिले होते. याच ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्काराची घटना घडली आणि नंतर तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर 10 ऑगस्ट रोजी हा आदेश जारी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंदोलक आरोप करत असतानाही पोलीस आयुक्त सातत्याने ते फेटाळत होते, असेही सुकांत मजुमदार यांनी म्हटले आहे.

पत्रात काय? -सुकांत मजूमदार यांनी X वर जे पत्र शेअर केले आहे, ते माजी प्राचार्य संदीप घोष यांनी पीडब्लूडीच्या इंजिनिअरला लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. यात, "रुग्णालयातील विविध विभागात डॉक्टरांच्या खोल्या आणि स्वतंत्र संलग्न स्वच्छतागृहांची कमतरता आहे. निवासी डॉक्टरांच्या मागणीनुसार तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी," असे म्हणण्यात आले होते.

ममतांवरही निषाणा - सुकांत मजुमदार यांनी हे पत्र शेअर करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुकांत माजुमदार यांनी X वर लिहिले आहे की, "हे पत्र पुष्टी करते की, पुरावे नष्ट करण्यासाठी पीडितेच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सेमिनार हॉल उद्ध्वस्त करण्यात आला. आरोग्य मंत्री आणि अयशस्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेशिवाय हे होऊ शकत नाही."

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरBJPभाजपाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू