Narendra Modi Birthday : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल फोन आणि सिमकार्ड वापरतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 09:28 AM2019-09-17T09:28:50+5:302019-09-17T09:29:49+5:30

Narendra Modi Birthday Special : तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतं सिमकार्ड वापरतात याबाबत दोन वर्षापूर्वी एक माहिती समोर आली होती.

Know, which mobile phone and SIM card does Prime Minister Narendra Modi use? | Narendra Modi Birthday : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल फोन आणि सिमकार्ड वापरतात?

Narendra Modi Birthday : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल फोन आणि सिमकार्ड वापरतात?

googlenewsNext

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. दरवेळेप्रमाणे नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जागोजागी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या जीवनाशी जोडलेल्या अनेक गोष्टी ऐकायला अथवा जाणून घ्यायला लोकांना आवडतात. मोदींच्या जीवनातील एक विशेष गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी मोबाईल वापरतात का? जर वापरत असतील तर कोणता मोबाईल त्यांना आवडतो याबाबत उत्सुकता असेलच. त्यामुळे नरेंद्र मोदी कोणता मोबाईल वापरतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अँपल कंपनीच्या स्मार्टफोनचा वापर करतात. 2018 मध्ये चीन आणि दुबईच्या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींच्या हातात अँपलचा iphone 6 सीरीजमधला स्मार्टफोन दिसून आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदी फक्त अँपलच्या मोबाईलचा वापर करतात. अँपलने iphone 6 सीरीजमध्ये iphone 6, iphone 6 plus आणि iphone 6s plus स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. 

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतं सिमकार्ड वापरतात याबाबत दोन वर्षापूर्वी एक माहिती समोर आली होती. त्यावेळी पहिल्यांदा मोदींनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्या स्क्रीनशॉटमधून नरेंद्र मोदी वोडाफोनचं नेटवर्क वापरत असल्याचं दिसून आलं होतं. 

मोदींच्या कॅबिनेटमध्ये सर्वात महत्वाचे मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू अमित शहा हेदेखील अँपलचा आधुनिक फोन iphone XS चा वापर करतात. अँपलने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. 
 

Web Title: Know, which mobile phone and SIM card does Prime Minister Narendra Modi use?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.