केरळ हे सामाजिक, धार्मिक सलोख्याचे उदाहरण : शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:22 IST2026-05-08T10:19:45+5:302026-05-08T10:22:22+5:30
मुस्लीम बहुल मतदारसंघात ख्रिश्चन उमेदवाराची निवड झाली. हिंदू बहुल मतदारसंधात मुस्लीम उमेदवाराची निवड झाली व ख्रिश्चन बहुल मतदारसंघात एका मुस्लीम उमेदवाराची निवड झाल्याचे अधोरेखित करत, ही एक ‘केरळ स्टोरी’ असल्याचे स्पष्ट केले.

केरळ हे सामाजिक, धार्मिक सलोख्याचे उदाहरण : शशी थरूर
Marathi News : नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने मिळवलेल्या विजयानंतर खासदार शशी थरूर यांनी केरळच्या सामाजिक सलोख्याचे कौतुक केले. जातीयवादी शक्तींनी लक्षात घ्यावी अशी हीच खरी ‘केरळ स्टोरी’ असल्याचे नमूद करत हे राज्य सामाजिक व धार्मिक सलोख्याचे आदर्श उदाहरण असल्याचा दावा गुरुवारी त्यांनी केला.
मुस्लीम बहुल मतदारसंघात ख्रिश्चन उमेदवाराची निवड झाली. हिंदू बहुल मतदारसंधात मुस्लीम उमेदवाराची निवड झाली व ख्रिश्चन बहुल मतदारसंघात एका मुस्लीम उमेदवाराची निवड झाल्याचे अधोरेखित करत, ही एक ‘केरळ स्टोरी’ असल्याचे स्पष्ट केले.
केरळ काँग्रेस (जोसेफ)ला किमान दोन मंत्रिपदे हवीत
केरळमध्ये सत्तेत येऊ घातलेल्या यूडीएफच्या नव्या सरकारमध्ये केरळ काँग्रेस (जोसेफ) पक्षाला किमान दोन मंत्रिपदे मिळावीत, अशी इच्छा पक्षाचे अध्यक्ष पी. जे. जोसेफ यांनी व्यक्त केली आहे. २०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत केरळ काँग्रेस (जोसेफ) गटाने सात जागांवर पक्षाने विजय मिळवला आहे.