शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:46 IST

Kedarnath News: या अपघातात एक भाविक बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.

Kedarnath News:उत्तराखंडमधीलकेदारनाथ येथून मोठी बातमी आली आहे. केदारनाथ मार्गावर जाणाऱ्या काही भाविकांचा भीषण अपघात झाला, ज्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर तीन जखमी आहेत. तसेच, एकजण अजून बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच डीडीआरएफला घटनास्थळी पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी(१८ जून) मध्यरात्री १२ वाजता घडली. केदारनाथला जाणारे काही लोक गौरीकुंड आणि रामबाडा दरम्यान जंगल चट्टी परिसरात थेट डोंगरावरुन खाली खंदकात कोसळले. या घटनेची माहिती मिळताच डीडीआरएफचे पथक आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. पथकाने दोघांचे मृतदेह काढले आहेत.

रविवारीही एका प्रवाशाचा मृत्यूयापूर्वी, रविवार(१५ जून) रोजी प्रवाशांसोबत अपघात झाला होता. मुसळधार पावसामुळे अचानक पावसाळी नाल्यात ढिगारा वाहून आल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. त्यानंतर सोनप्रयागकडून केदारनाथला जाणाऱ्या पायी प्रवासावरही काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती.

प्रशासनाचे भाविकांना आवाहन उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा जारी केला आहे. पावसामुळे तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत, प्रवाशांनी हवामान अंदाजानुसार प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंडAccidentअपघात