शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:58 IST

Siddaramaiah News: सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका सभेमध्ये सिद्धारामैय्या यांना असाच राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला खडसावत मारण्यासाठी त्याच्यावर हात वर केला.

आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोमवारी आयोजित करण्यात  आलेल्या काँग्रेसच्या एका सभेमध्ये सिद्धारामैय्या यांना असाच राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला खडसावत मारण्यासाठी त्याच्यावर हात वर केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या हे काँग्रेसच्या एका सभेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. या प्रकारामुळे सिद्धारामैय्या हे नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी सभेच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमानी यांची खरडपट्टी काढली. यादरम्यान, एक क्षण असा आला जेव्हा सिद्धारामैय्या यांच्या स्वत:वरचा ताबा सुटला आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र सिद्धारामैय्या यांचा तो पवित्रा पाहून हे पोलीस अधिकारी मागे हटले.

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी मंचावर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उभ्या असलेल्या सिद्धारामैय्या यांनी संतप्त होत पोलीस अधिकाऱ्याला बोलावून विचारले की, अरे इकडे ये, एसपी कोण आहे? तुम्ही लोक काय करताय? सिद्धारामैय्या यांच्या या आक्रमक अवतारामुळे सभास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सिद्धारामैय्या यांनी हात वर उचलला, त्यामुळे ते पोलीस अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत होते, असे व्हिडीओमधून दिसत आहे.  

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसPoliceपोलिस