शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायनिवाड्याचा तर्क ‘आरटीआय’ कक्षेबाहेर

By admin | Updated: June 16, 2014 03:52 IST

न्यायालयाने दिलेला निकाल किंवा आदेश यामागील कारणमीमांसा आणि आधार याबद्दलचा तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) उघड केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : न्यायालयाने दिलेला निकाल किंवा आदेश यामागील कारणमीमांसा आणि आधार याबद्दलचा तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) उघड केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. माहिती अधिकारी कायद्यांतर्गत स्थापन सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलिय प्राधिकरणाने यासंदर्भातील एका आरटीआय कार्यकर्त्याची याचिका फेटाळली. फेरयाचिकेवर निकाल देताना सुनावणी करण्यात आली नाही किंवा निवाड्याचा कोणताही तर्क देण्यात आला नाही. अशा प्रकरणांत संबंधित निकालामागील तर्क आणि आधार काय आहे, याबद्दलची माहिती देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. सीपीआयओ (सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन आॅफिसर) हे प्राधिकरण किंवा व्यक्ती नव्हे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशामागील तर्क मागितला जाऊ शकत नाही, असेही अपीलिय प्राधिकरणाने वकील असलेल्या रवींदर राज यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माहिती अधिकाऱ्याने रवींदर राज यांना काही प्रकरणांची माहिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी अपीलिय प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने खानापुरम प्रकरणाचा निकाल देताना म्हटले होते की, न्यायाधीश निवाडा किंवा आदेशाच्या माध्यमातून बोलत असतात. कोणताही अर्जदार विशिष्ट आदेश किंवा निकाल का देण्यात आला आणि त्यामागे काय तर्क आहे, याविषयी माहिती मागू शकत नाही, असे अपीलिय प्राधिकरणाने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)