शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देशात आयटी क्षेत्रात नाेकऱ्या हाेतील निर्माण; ‘नॅसकाॅम’ने बँक ऑफ अमेरिकेचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 09:15 IST

चालू आर्थिक वर्षातही भारतीय आयटी कंपन्या ९६ हजार कर्मचाऱ्यांना नाेकरी देणार आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील आघाडीच्या साॅफ्टवेअर कंपन्या २०२२ पर्यंत ३० लाख कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचा बँक ऑफ अमेरिकेने अहवाल दिला हाेता. ताे ‘नॅशनल असाेसिएशन ऑफ साॅफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीज’ने (नॅसकाॅम) फेटाळला आहे. 

‘नॅसकाॅम’ने एका निवेदनात म्हटले आहे, की याउलट या कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात १ लाख ३८ हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेतले. तसेच चालू आर्थिक वर्षातही भारतीय आयटी कंपन्या ९६ हजार कर्मचाऱ्यांना नाेकरी देणार आहेत. बँक ऑफ अमेरिकेच्या अहवालात ऑटाेमेशनमुळे नाेकरकपात हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. याउलट ‘नॅसकाॅम’ने म्हटले आहे, की ऑटाेमेशनद्वारे आयटी क्षेत्रातील कामाचे स्वरूप बदलून अडीच लाखांहून अधिक नाेकरभरती हाेईल. नुकतेच कंपन्यांनी डिजिटल क्षेत्रात प्रशिक्षित असलेल्या ४० हजार फ्रेशर्सना नाेकऱ्या दिल्याचे ‘नॅसकाॅम’ने म्हटले आहे. नेसकॉमच्या दाव्यामुळे देशातील आयटी क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अहवालातील मुद्दे चुकीचेn बँक आफ अमेरिकेच्या अहवालात नाेकरकपातीबाबत काही मुद्दे चुकीचे असल्याचे ‘नॅसकाॅम’ने म्हटले आहे. ऑटाेमेशन आणि ‘आरपीए’ क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून विकसित हाेत आहे. त्यामध्ये सुमारे २००  अब्ज डाॅलर्स एवढी क्षमता असून, आणखी नाेकऱ्यांसाठी भरपूर वाव असल्याचे ‘नॅसकाॅम’ने स्पष्ट केले आहे. 

काय हाेता दावा? n इन्फाेसिस, टीसीएस, काॅग्नीझंट, विप्राे, टेक महिंद्र यासारख्या आघाडीच्या साॅफ्टवेअर कंपन्या ऑटाेमेशन प्रक्रियेमुळे २०२२ पर्यंत ३० लाख नाेकरकपात करतील, असा दावा बँक ऑफ अमेरिकेने एका अहवालातून केला हाेता. त्याद्वारे सुमारे १०० अब्ज डाॅलर्स एवढी बचतही या कंपन्या करतील, असाही दावा करण्यात आला हाेता. 

टॅग्स :jobनोकरीITमाहिती तंत्रज्ञान