शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करायला आलेला चोर पोलीस स्टेशनला गेला अन् गावकऱ्यांविरोधातच दाखल केली एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:20 IST

Jharkhand: या अजब घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Jharkhand News: झारखंडची राजधानी रांचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे 'चोर तो चोर, वर शिरजोर' ही म्हण खरी ठरली. चोरी करण्यासाठी आलेल्या एका टोळीतील चोराने स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि चक्क गावकऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही, तर सोशल मीडिया आणि संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

झाले असे की, ४ जूनच्या रात्री १ वाजता पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील रहिवासी विजय कुमार आपल्या पाच साथीदारांसह रांचीच्या सत्यारी परिसरात चोरी करण्यासाठी आला होता. चोरांनी एका घरात घुसून कपाटातून सोन्याची साखळी आणि रोख रक्कम चोरली. पण त्यानंतर घरमालक जागा झाला आणि आरडाओरडा करू लागला. यानंतर, चोरांनी तोंड दाबून त्याला विहिरीत फेकण्याचाही प्रयत्न केला. पण, आवाज ऐकून गावकरी जागे झाले आणि घटनास्थळी पोहोचले. 

अंधाराचा फायदा घेत दोन चोर पळून गेले, तर विजयसह इतर चार जणांना पकडण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत विजयचा हात तुटला, त्याच्या साथीदारांनाही गंभीर दुखापत झाली. यानंतर विजय कुमार स्वतः जगन्नाथपूर पोलिस स्टेशनला पोहोचला आणि गावकऱ्यांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. 

विजयने आपल्या जबाबात म्हटले की, गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे होते, परंतु त्यांनी बेदम मारहाण केली. चोराच्या तक्रारीवरुन स्टेशन प्रभारी दिग्विजय सिंह यांनी अज्ञात ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस