शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 12:10 IST

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.

श्रीनगर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश त्याचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. तसेच गोळीबारासह मोठया प्रमाणावर तोफगोळयांचा मारा करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीमध्ये पाकिस्तानकडून मोठया प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भारताने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं.


जवळपास 6 सहा महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा दलाने 93 दहशतवाद्यांना कंठस्थान कंठस्नान घालून मोठं यश मिळवले आहे. या दहशतवाद्यांमध्ये टॉप लीडर असलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एकत्र येत जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नियंत्रण रेषा (एलओसी) आणि दुर्गम भागात दहशतवादविरोधी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांविरोधात मोहीम उभारली आहे. दोन टॉप दहशतवादी लीडर रियाझ नायकू आणि जुनैद सेहराई यांच्यासह परदेशी दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे हे दहशतवादी असल्याचे उघडकीस आले आहे. आगामी काळात दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता काश्मीर खोऱ्यात चकमकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!

CoronaVirus News : अंधश्रद्धेनेच घात केला, कोरोनावर उपचार करणाऱ्या भोंदूबाबाचा मृत्यू झाला; परिसरात खळबळ

CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च

CoronaVirus News : कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय?, घरीच जाणून घ्या रेस्पिरेटरी रेट; आरोग्यमंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण!

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी