CoronaVirus News : अंधश्रद्धेनेच घात केला, कोरोनावर उपचार करणाऱ्या भोंदूबाबाचा मृत्यू झाला; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 09:45 AM2020-06-11T09:45:58+5:302020-06-11T10:13:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भक्तांनाचा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News tantrik death due to corona many infected | CoronaVirus News : अंधश्रद्धेनेच घात केला, कोरोनावर उपचार करणाऱ्या भोंदूबाबाचा मृत्यू झाला; परिसरात खळबळ

CoronaVirus News : अंधश्रद्धेनेच घात केला, कोरोनावर उपचार करणाऱ्या भोंदूबाबाचा मृत्यू झाला; परिसरात खळबळ

Next

रतलाम - कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून देशात प्रथमच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात खूप मोठी वाढ झाली आहे. सध्या जितके रुग्ण उपचार घेत आहेत, त्याहून अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार असली तरी त्यापैकी तब्बल 1 लाख 35 हजार 205 जण या आजारावर मात करून घरी परतले आहेत. अमेरिका, रशिया, ब्राझील, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन या देशांच्या तुलनेत भारताचामृत्यूदरही खूप कमी म्हणजे 2.8 टक्के इतकाच आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

मध्य प्रदेशच्या रतलाममधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या एका भोंदूबाबाचा कोरोनानेच मृत्यू झाला आहे. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तांनाचा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेले तब्बल 23 भक्त कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रतलामच्या नयापुरा परिसरात एक भोंदूबाबा कोरोनावर उपचार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे 4 जून रोजी त्याचाच कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रशासाने भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला. काही भक्तांची चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने अशा सर्व बाबांवर बंदी घातली आहे. तसेच रतलाममधील इतर 29 बाबांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

कोरोनावर उपचार करण्यासाठी अनेक भक्त या भोंदूबाबाकडे येत असत. त्यावेळी तो आपल्या भक्तांना फूंकून पाणी पाजत असत आणि त्यांच्या हातांचा मुका घेत. त्यामुळं कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्याचं म्हटलं जात आहे.  प्रशासनाने भोंदूबाबांपासून लोकांना दूर राहण्याचे आवाहन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जून महिन्यात दररोज 8 ते 10 हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. जवळपास दोन महिने लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे गेली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च

CoronaVirus News : कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय?, घरीच जाणून घ्या रेस्पिरेटरी रेट; आरोग्यमंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं भलं मोठं बिल, आकडा पाहून तुम्ही व्हाल हैराण!

बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा

CoronaVirus News : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'हा' फॉर्म्युला लागू होणार?

CoronaVirus News : धोका वाढला! एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये व्हायरसचा पुन्हा शिरकाव

Web Title: CoronaVirus Marathi News tantrik death due to corona many infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.