शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथमध्ये अडकलेले जिल्ह्यातील भाविक जम्मूकडे सुखरूप परतले गुरुवारी जळगावात परतणार : सुरक्षा दलातील जवानांची कडक सुरक्षा

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.
अमरनाथ यात्रेसाठी जळगावसह खान्देशातून भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांचा एक ग्रुप अमरनाथ यात्रेला काही दिवसांपूर्वी रवाना झाला होता. त्यात कांदा व्यापारी चंद्रकांत अशोक पाटील, राजू रमेश ठाकूर, भरत वासुदेव पाटील, अजय पाटील, सुभाष भोई हे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जळगाव येथील एलआयसीचे अधिकारी श्याम कोठावदेही आहेत. परंतु काश्मिरातील हिंसाचारामुळे हेे व्यापारी शनिवार व रविवार बालटालमध्येच अडकले होते.

ताणावग्रस्त स्थिती, रस्त्यांवर जळते टायर, दगड
रविवारी बालटालमध्ये ५० रुपये लीटर या दरात पिण्याचे पाणी मिळत होते. भाविकांमधील भीती व अडचणी लक्षात घेता. सुरक्षा दलातील अधिकार्‍यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर (रात्री २ वाजता) बालटालमध्ये अडकलेल्या सर्व दोन हजार भाविकांना ८०० लहान खाजगी चारचाकींमधून बालटालमधून श्रीनगरकडे आणले. भाविकांच्या चारचाकींच्या मागे व पुढे सुरक्षा दलातील जवान, अधिकारी यांच्या अनेक मोटारी होत्या. बालटाल ते श्रीनगर या दरम्यानच्या रस्त्यांवर दगडांचा खच होता. अनेक ठिकाणी टायर जाळले होते. ते दगड दूर करीत सुरक्षा दलातील जवानांनी भाविकांना श्रीनगरपुढे ५० कि.मी.पर्यंत सोडले.

भाविक जम्मूमध्ये
सोमवारी सकाळी भाविक जम्मू येथे सुरक्षित परतले. त्यांनी वैष्णव देवीचे दर्शन घेतले. येत्या गुरुवारी जळगाव शहरातील व्यापार्‍यांचा ग्रुप व इतर भाविक जम्मू येथून विमानाने मुंबईत येणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत हे भाविक शहरात परततील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.