शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त 60 मिनिटांत

By admin | Updated: March 1, 2017 13:06 IST

जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल असा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - दिल्लीहून मुंबईचा प्रवास फक्त 60 मिनिटांत आणि मुंबई ते चेन्नई प्रवास 30 मिनिटांत पुर्ण होऊ शकतो का ? तसं पाहायला गेलं तर विमानालाही यापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका अशा टेक्नॉलॉजीवर चर्चा केली आहे ज्यामुळे हे सत्यात उतरु शकतं आणि तुम्ही बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने प्रवास करु शकता. अमेरिकेतील कंपनी 'हायपरलूप वन' भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यांनी दावा केला आहे की चुंबकीय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान आणि प्रवाशांना अत्यंत वेगाने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवलं जाऊ शकतं. 
 
 (सुपरफास्ट! दुबई ते अबुधाबी प्रवास अवघ्या 12 मिनिटांत)
 
हायपरलूप बनवण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपनीने भारतात पाच मार्ग सुचवले आहेत. यामध्ये बंगळुरू ते चेन्नई, बंगळुरू ते तिरुवअनंतपुरम, मुंबई ते चेन्नई आणि बंगळुरू ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे.
 
जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने ‘भारतासाठी हायपरलूप वन व्हिजन’ या संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. संमेलनात सादरीकरणावेळी कंपनीने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल, असा दावा केला. 
 
'अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत', असं सुरेश प्रभू यांनी कार्यक्रम संपल्यानंतर सांगितलं आहे. 'मुंबई ते दिल्ली 60 मिनिटं आणि चेन्नई ते मुंबई फक्त 30 मिनिटांत प्रवास करण्याबाबत विचार केला जात आहे. भारतीय रेल्वे आधुनिकीकरण आणि वेग वाढवण्यावर जोर देत आहे. वेगावर आमचं मुख्य लक्ष असून तो वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत', असं सुरेश प्रभू बोलले आहेत.