शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:37 IST

Israel Iran Ceasefire: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी इस्राइलविरुद्धच्या संघर्षात घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचं कौतुक केलं आहे. तसेच या संघर्षामधून इराण हा मुस्लिम जगतामधील नवा नेता म्हणून समोर आला आहे, असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.

मागच्या १२ दिवसांपासून इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आला असून, दोन्ही देश युद्धविरामासाठी सहमत झाले आहेत. या युद्धामध्ये इराणने दाखवलेल्या कमालीच्या आक्रमकतेची दखल जगभरातून घेतली जात आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी इस्राइलविरुद्धच्या संघर्षात घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचं कौतुक केलं आहे. तसेच या संघर्षामधून इराण हा मुस्लिम जगतामधील नवा नेता म्हणून समोर आला आहे, असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.

सुमारे १२ दिवस चाललेल्या या संघर्षामधून इराणने अमेरिका आणि इस्राइलला चांगला धडा शिकवला आहे, ही जगभरातील अभिमानाची बाब आहे, अशा शब्दात महबूबा मुफ्ती यांनी इराणची प्रशंसा केली आहे. त्या म्हणाल्या की, अमेरिकेसारख्या महाशक्तीसोबत लढण्यासाठी मी इराणमधील जनता, तिथलं लष्कर आणि नेतृत्वाला सलाम करते. इराणकडे फारमोठा शस्त्रसाठा, अणुबॉम्ब असं काही नव्हतं. तरी त्यांनी या युद्धात अमेरिका आणि इस्राइलला धूळ चारली. तसेच अखेरीस युद्धविरामाची मागणी इराणकडून करण्यात आली नाही. या युद्धामुळे इराणची प्रशंसा वाढली आहे. तसेच मुस्लिम जगतामध्ये इराण हा जागतिक नेतृत्व म्हणून समोर आला आहे, अशा शब्दात महबूबा मुफ्ती यांनी इराणचं कौतुक केलं आहे.

महबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, इराणने अमेरिकेला असा धडा शिकवला आहे, जो दीर्घकाळापर्यंत लक्षात ठेवला जाईल. हा संघर्ष थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना कतारची मदत घ्यावी लागली. तसेच इस्राइल युद्धविरामास तयार आहे, आता तुम्ही इराणला युद्धविरामासाठी तयार करा, असं सांगावं लागलं. एक मुस्लिम म्हणून आणि संपूर्ण जगभरातील मुस्लिमांसाठी ही आनंदाची बाब आहे.  मात्र दुर्दैवाने कुठल्याही मुस्लिम देशाने या संघर्षात इराणला मदत केली नाही, अशा शब्दात महबूबा मुफ्ती यांनी नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीIranइराणIsraelइस्रायलUnited Statesअमेरिका