घराबाहेर पडल्याने कोरोनाला घरात येण्याचे निमंत्रण- डॉ. रमण गंगाखेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 02:36 AM2020-03-30T02:36:01+5:302020-03-30T02:37:00+5:30

जबाबदार नागरिक बना; घाबरून जाऊ नका, मृत्यूदर कमी असला तरी हा आजार लवकर पसरतो

Inviting Corona to come home after leaving home - Dr. Raman Gangakhedkar | घराबाहेर पडल्याने कोरोनाला घरात येण्याचे निमंत्रण- डॉ. रमण गंगाखेडकर

घराबाहेर पडल्याने कोरोनाला घरात येण्याचे निमंत्रण- डॉ. रमण गंगाखेडकर

Next

-लटेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध आपले युद्ध सुरू आहे. हे युद्ध आपण जिंकूच, असा ठाम विश्वास आयसीएमआरचे संशोधक पद्मश्री सन्मानित डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. वृद्ध, लहान मुलांची विशेष काळजी घ्या. घाबरून जाऊ नका. मृत्यूदर कमी असला तरी हा आजार लवकर पसरतो. कोरोना पसरू द्यायचा नसेल तर काही गोष्टी समजून घ्या. लॉकडाऊन केल्याने लोक घराबाहेर पडणार नाहीत. सोशल डिस्टन्सिंग हाच या घडीला एकमेव पर्याय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. घराबाहेर पडून आपण कोरोनाला घरात येण्याचे निमंत्रण देऊ, अशा शब्दात त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

साधी सर्दी, खोकल्याची लक्षणे असतील तर फॅमिली डॉक्टरांशी बोला. हेल्पलाईनला फोन करा. रुग्णालयात जाणे टाळा. ताप आला की आपल्याला कोविड -१९ झालाय अशी भीती वाटते. स्वत:हून चाचणी करणे टाळा. जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत चाचणी करू नका. त्यात पैसे वाया जातील. एखादा खाद्यपदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, हे औषध घ्या- असा सल्ला ऐकू नका. मनाने काहीही करण्याऐवजी सरकार जे सांगत आहे केवळ ते आणि तेच करा. अकारण रुग्णालयात जाण्याने तेथील डॉक्टर, नर्सेसवर ताण वाढेल.काही लक्षणे तीव्र होऊ लागली तर मात्र आवर्जून डॉक्टरांकडे जा.

पाणी-साबण नसेल तर?

वारंवार हात धुवा. हात धुण्यास पाणी, साबण उपलब्ध नसेल तर साधी गोष्ट करा. जोपर्यंत पाणी, साबण उपलब्ध होत नाही तोपर्यंत चेहऱ्यास हात लावू नका. पाणी-साबण उपलब्ध झाले की लगेच मिनिटभर हात स्वच्छ धुवा. अगदी साधा साबणही चालेल. सॅनिटायझरही महागडे पाहिजेत, हाही विचार चुकीचा आहे.

यशस्वी लढा देऊ

आपण घाबरतोय तसा हा आजार नाहीच. पण थोडे घाबरले पाहिजेच. सभोवतालच्या लोकांविषयी आत्मीयता ठेवा. घराबाहेर पडणाऱ्यांना समजावून सांगा. आपण सगळे एकत्र आलो तर या विषाणूविरोधात यशस्वी लढा देऊ. वृद्ध, लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू. आपण यशस्वीपणे लढू शकू. केवळ तीन आठवड्यांचा प्रश्न आहे . त्यानंतर पुन्हा जनजीवन सुरळीत होईल. आपण एवढा देशासाठी त्याग करू शकत नसू तर आपण स्वत:लाच प्रश्न करावा, की आपण नेमके कसे आहोत? आपण सारेच भारताचा विचार करणारे जबाबदार लोक आहोत. हा विश्वास गमावू नका. घरातच थांबा. ही लढाई आपण जिंकूच.

ऐतिहासिक लॉकडाऊन

च्देशात आरोग्यासाठी कधीही लॉकडाऊन करण्यात आले नाही. युद्धातही संपूर्ण देश बंद होत नाही. पण याक्षणी त्याचीच गरज आहे. तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळता आहे. पण शेजारचा पाळत नाही. त्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात असे समजू नका. जो पाळत नाही, त्यांना समजावून सांगा. घराबाहेर न पडण्यासाठी प्रोत्साहित करा.

च्घराबाहेर पडून आपण स्वत:च कोरोनाला घरी येण्याचे निमंत्रण देणार आहोत. घराबाहेर पडणाºयांमुळे हा आजार त्यांच्याच घरात येईल. मधुमेह, हृदयविकार असलेले, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना जपा. पुढचे दोन-तीन आठवडे कुणाच्याही पाया पडू नका. त्यानेही कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढेल.

Web Title: Inviting Corona to come home after leaving home - Dr. Raman Gangakhedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.