ऑनलाइन टीम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवी दिल्ली, दि. २३ - काळा पैशाच्या तपासासाठी व त्यावर नजर ठेवण्यासाठी एका आठवड्यात विशेष तपास पथकाची नेमणूक करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले आहेत.
काळा पैशाच्या तपासासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने काळा पैशाचा तपासासंदर्भात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यासाठी केंद्र सरकारला एक आठवड्याची मुदत दिली आहे . तसेच या प्रकरणातील सर्व महत्त्वपूर्ण व गोपनीथ कागदपत्र महसूल विभागातील सचिवपदाच्या अधिका-यांच्या देखरेखीखाली ठेवावीत असे कोर्टाने म्हटले आहे.