शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

कर्नाटक भाजपत कलह! पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 6:28 PM

यावर बोलताना, कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

बेंगळुरू - कर्नाटक भाजपत अंतर्कलह दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांना हटविण्याची मागणी जोर धरत आहे. यातच, "एक अथवा दोन लोक मिडियात बोलत आहेत. ते वाढवून दाखविले जाते. ते लोक सुरुवातीपासूनच असे करत आहेत. एवढेच नाही, तर पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अरूण सिंह यांनीही त्यांना भेट दिली नाही. अशात कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. (Internal fight in karnataka bjp The party mlc vishwanath serious allegations of Rs 21,000 crore scam)

पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा -मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, जर काही मुद्दा असेल तर आम्ही त्यावर चर्चा करू आणि 2-3 सदस्यांच्या शंकेचे समाधान करू. मी भाजपचे विधान परिषद सदस्य एएच विश्वनाथ यांच्यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या संदर्भात निर्णय घेतील. यापूर्वी, कर्नाटक भाजपत कलह वाढण्यासंदर्भात आणि मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना हटविल्या जाण्यासंदर्भात  अंदाज वर्तवले जात असतानाच, राज्याचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी गुरुवारी आमदारांसोबत भेट घेतली.

Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग; बीएस येडियुरप्पा यांची सूचक प्रतिक्रिया

यावेळी सिंह यांनी पक्षात एकी आहे आणि काही नाराज आमदार सरकार आणि त्यांच्या नेतृत्वाविरोधात वक्तवे करत आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी अशा नेत्यांना इशारा देत, त्यांच्या अशा वागण्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे, असेही म्हटले आहे.

येडियुरप्पांना हटविण्याची मागणी  -विश्वनाथ यांनी उघडपणे येडियुरप्पा यांना हटविण्याची मागणी केली असून त्यांचा छोटा मुलगा आणि कर्नाटक भाजप उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले, “भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात 20 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले.”

21,473 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप - भारतीय जनता पक्षाचे नाराज विधानपरिषद सदस्य ए. एच. विश्वनाथ यांनी शुक्रवारी, पाटबंधारे विभागाने 21,473 कोटी रुपयांची निविदा कुठल्याही प्रकारची वित्तय मंजुरी न घेताच घाई घाईने तयार केली आणि यात घोटाळा झाला असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाPoliticsराजकारण