शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन त्रिस्तरीय चर्चेत युद्धसामग्री हटविण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 06:28 IST

भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

नवी दिल्ली : भारतामध्येचीनविरोधात रोष वाढल्याची झळ आता बीजिंगमध्येही जाणवू लागली आहे. चीनने पहिल्यांदाच त्रिस्तरीय चर्चेची तयारी दर्शवली आहे. भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. याबरोबरच चिनी परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागातील अधिकाऱ्यांना भारतीय दूतावासातील अधिकाºयांना बीजिंगमध्ये चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक गलवान खोºयातून मागे हटले असून, गेल्या महिनाभरात सीमेवर तैनात केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे हटविण्यावर आता चर्चा सुरू होईल. चीनने अत्याधुनिक टँक, तर भारताने अत्याधुनिक रडार सीमेवर तैनात केले आहे.भारत-चीनदरम्यान गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच हिंसक झटापट झाली. त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय जगात उमटले. कोरोनाचे सावट व आशिया खंडातील अशांततेमुळे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनीसारखे मोठे देशही धास्तावले. भारताने चीनला सडेतोड उत्तर देताना त्यांच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही देशांचे सैनिक वेगवेगळ्या चौक्यांमधून मागे हटत असले तरी युद्धसामग्री अद्याप तेथेच आहे. ज्यात प्रामुख्याने टँक, रडारचा समावेश आहे.चीनने जमवला आहे सीमेवर युद्धसाठाचीनने मोठा युद्धसाठा सीमेवर जमवला आहे. लढाऊ हेलिकॉप्टर, शस्त्रसज्ज सैनिक, बांधकाम साहित्यदेखील पँगाँग सरोवराच्या परिसरात आढळले होते. हेच साहित्य हटविण्याचा आग्रह भारताचा आहे, तरच तणाव निवळेल.च्भारताकडून आर्थिक आघाडीवरही चीनविरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. चीनसमवेत चर्चा सुरू असली तरी भारताने रशिया व जर्मनीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे खरेदी करण्याचा सौदा निश्चित केला आहे. असे असले तरी चीनने युद्धसाहित्य मागे नेल्यास भारतालाही तसेच करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत