इंडिगो विमानात बिघाड, 28 प्रवासी जखमी

By Admin | Updated: August 21, 2014 02:11 IST2014-08-21T02:11:39+5:302014-08-21T02:11:39+5:30

मुंबईहून आलेल्या इंडिगोच्या एअर ए-32क् या विमानाच्या लॅन्डिंग गीअरमध्ये उतरत असतानाच बिघाड झाला आणि विमानाच्या डाव्या बाजूने धूर निघू लागला.

Indigo plane crash, 28 passengers injured | इंडिगो विमानात बिघाड, 28 प्रवासी जखमी

इंडिगो विमानात बिघाड, 28 प्रवासी जखमी

नवी दिल्ली : मुंबईहून आलेल्या इंडिगोच्या एअर ए-32क् या विमानाच्या लॅन्डिंग गीअरमध्ये उतरत असतानाच बिघाड झाला आणि विमानाच्या डाव्या बाजूने धूर निघू लागला. या घटनेनंतर बराच गोंधळ उडाला आणि विमान टॅक्सीवेकडे वळवून प्रवाशांना इमजर्न्सी स्लाईड शूट्समधून बाहेर काढण्यात आले. या विमानात 148 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते. त्यातील 28 प्रवासी विमानातून बाहेर पडत असताना किरकोळ जखमी झाले. 

 

Web Title: Indigo plane crash, 28 passengers injured