शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये चुकून पडले भारताचे क्षेपणास्त्र; अडविता न आल्याने झाला तिळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 06:27 IST

ही घटना ९ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली हाेती. नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलाेमीटरवर पडले.

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचे एक क्षेपणास्त्र चुकीने पाकिस्तानात जाऊन पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्रालयाने यास दुजाेरा दिला असून, तांत्रिक चुकीने क्षेपणास्त्र डागले गेल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी काेर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत, तर पाकिस्तानने या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, भारताने उत्तर देण्याची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना ९ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली हाेती. नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलाेमीटरवर पडले. त्यावर काेणतीही शस्त्रे किंवा स्फाेटके नव्हती. त्यामुळे काेणतीही प्राणहानी झालेली नाही, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाने या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, चाैकशीचे आदेश दिले आहेत. 

भारताचे एखादे विमान मुलतान भागात मियां चन्नू येथे काेसळल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या हाेत्या. पाकिस्तानी लष्करानेही या ठिकाणाचा उल्लेख केला हाेता. या घटनेमुळे काही इमारतींचे नुकसान झाले. क्षेपणास्त्र डागले गेले त्यावेळी भारत आणि पाकिस्तानी हवाई हद्दीत अनेक प्रवासी विमाने हाेती. क्षेपणास्त्र ४० हजार फूट उंचीवर हाेते, तर विमाने ३५ ते ४२ हजार फूट उंचीवर हाेती. त्यामुळे माेठ्या अपघाताचीही शक्यता हाेती.

ते क्षेपणास्त्र ब्रह्माेस असल्याचा दावा
क्षेपणास्त्र कोणते होते, याबाबत भारताने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, जे क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडले ते सुपरसाॅनिक क्षेपणास्त्र ‘ब्रह्माेस’ असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. 
हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र असून त्याचा ताशी २५०० किलाेमीटर वेग आहे. याचा साठा राजस्थानातील श्रीगंगानगर येथे ठेवण्यात आला आहे. परंतु, ते सिरसा येथून डागण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. ब्रह्मोस भेदणे अशक्य असल्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे.

क्षेपणास्त्र जरी चुकीने सुटले असले तरीही पाकिस्तानी एअर डिफेन्स यंत्रणेला ते ट्रॅक तर करता आले; परंतु भेदता आलेले नाही. 

क्षेपणास्त्र ४० हजार फुट उंचीवर हाेते. तर विमाने ३५ ते ४२ हजार फुट उंचीवर हाेती. त्यामुळे माेठ्या अपघाताचीही शक्यता हाेती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान