शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आयकर अधिकाऱ्यांची दहशत पसरवली

By admin | Updated: September 13, 2016 05:06 IST

काळ्या पैशांच्या मुद्यावरून सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. काळा पैसा परत आणण्याच्या नावाखाली सरकारने देशात आयकर अधिकाऱ्यांची दहशत पसरवली आहे

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकाळ्या पैशांच्या मुद्यावरून सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. काळा पैसा परत आणण्याच्या नावाखाली सरकारने देशात आयकर अधिकाऱ्यांची दहशत पसरवली आहे, असा आरोप सोमवारी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केला. मनीष तिवारी म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या अधिकाऱ्यांनी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आयकराच्या नोटीस पाठविल्या. प्रामाणिक करदात्यांमध्ये त्यामुळे भीती पसरली आहे. सरकारने काळा पैसा जाहीर करण्याची जी योजना जाहीर केली आहे त्या योजनेंतर्गत फक्त २४२८ कोटी रुपये मिळाले आहेत, तर विदेशी बँकांत भारतीयांचे २५ लाख कोटी रुपये असल्याचा दावा भाजपच्याच टास्क टीमने केला होता. मोदी यांनी हा निवडणुकीचा मुद्दा केला होता आणि हा पैसा शंभर दिवसांत आणण्याचा शब्द दिला होता, याची आठवणही तिवारी यांनी करून दिली. सर्वांच्या खात्यात १५-१५ लाख रुपये टाकण्याचेही आश्वासन दिले होते. दोन वर्षेझाली तरीही काळा पैसा आला नाही; पण आयकर अधिकाऱ्यांची दहशत मात्र आली आहे. काळा पैसा घोषित करण्याची योजना समाप्त होण्यास आता १८ दिवस बाकी आहेत आणि सरकारकडे देशातून ४००० कोटींचा कर जमा झाला, असेही ते म्हणाले.