शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

लग्नासाठी प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 12:15 PM

मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती.

नवी दिल्ली : केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून,  एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने हुंड्याच्या मागणीमुळे आत्महत्या केली आहे. मृत तरूणी ही तिरुवनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी होती. तरूणीच्या मृत्यूनंतर केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी महिला व बालविकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती. ती कॉलेजजवळील एका घरात भाड्याने राहत होती. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शहानाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न मोडल्याने ती अस्वस्थ होती आणि त्यामुळेच आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कॉलेजमधील डॉक्टरवर शहानाचे प्रेम होते आणि त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. मात्र, संबंधित डॉक्टर लग्नासाठी हुंड्याची मागणी करत होता. 

लग्नास नकार दिल्याने आत्महत्यामाहितीनुसार, लग्न करण्यासाठी डॉक्टर तरूणाने हुंडा म्हणून सोने, जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. मुलाची ही मागणी पूर्ण करण्यास मुलीचे कुटुंबीय असमर्थ होते. हे कळताच त्याने लग्नाला नकार दिला. लग्न मोडल्यामुळे शहानाला मोठा धक्का बसला अन् तिने टोकाचे पाऊल उचलले. खरं तर तिच्या वडिलांचे देखील काही काळापूर्वी निधन झाले. 

...तर मुलाच्या कुटुंबीयांवर कारवाई  दरम्यान, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा वकील साथी देवी यांनी शहानाच्या आईची त्यांच्या घरी भेट घेतली. शहानाच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने पोलिसांकडून अहवाल मागितला आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा सतीदेवी यांनी सांगितले की, मुलाच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केली असेल, तर त्यांच्याविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.  

टॅग्स :KeralaकेरळDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नdowryहुंडाdoctorडॉक्टर