शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे

By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST

महत्वाचे

महत्वाचे
महिला मेळावा व लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर
नागपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित कला भवन चंदननगर येथे महिला मेळावा व लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन मंडळाचे सहा. कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाला कल्पना पांडे, संजिवनी चौधरी, कुंदा नागपूरे उपस्थित होते. शिबीरात महिलांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली.
धर्मनिरपेक्ष व समाजवादी शब्द वगळण्याचा निषेध
नागपूर : सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द वगळ्यात आले आहे. हा बदल भाजपाचा नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा एजेंडाचा भाग आहे. या प्रकाराचा भारतीय दलित पँथरने निषेध केला आहे.
बहुउद्देशीय आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थींचा सत्कार
नागपूर : बहुउद्देशीय आरोग्य सेवकांच्या परीक्षेत नागपुरातील विनोद गजभिये, भानुदास झाडे व कांचन पगार हे राज्यातून पहिल्या तीन क्रमांकावर आले आहे. नागपुरात राज्य प्रशिक्षण धोरण विषय कार्यशाळेत या तिघांचा सत्कार उपसंचालक डॉ. तानाजी माने यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला श्याम निमगडे, डॉ. पी. आर. जक्कल, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल उपस्थित होते.
नवयुग शाळेत मातृशक्ती संमेलन
नागपूर : राजाबाक्षा येथील नवयुग प्रा. शाळेत मातृशक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण समुपदेशक उज्ज्वला पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन विघ्ने, ऋचा हळदे, गुणवंत नागेलवार उपस्थित होते. डॉ. विघ्ने यांनी मातापालकांना शिशुचे संगोपन, व्यक्तिमत्त्वाचा विकास यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
बुनकर पावरलूम असो. आमदाराला निवेदन
नागपूर : एपीएल कार्डधारक चार महिन्यापासून रेशनपासून वंचित आहेत. सिलेंडरच्या वितरण प्रणातील गोंधळामुळे सामान्य जनता त्रस्त आहेत. सामान्य जनतेला केरोसिन मिळणे कठीण झाले आहे. यासह अन्य मागण्यासाठी बुनकर पावरलुम असो. चे अध्यक्ष सदरुद्दीन अंसारी यांच्यासह शिष्टमंडळाने आ. विकास कुंभारे यांची भेट घेऊन, त्यांना समस्येचे निवेदन दिले.
गांधीबाग येथे ताजुद्दीनबाबा जन्मोत्सव साजरा
नागपूर : हिंदू-मुस्लीम नवयुवक एकता कमिटीतर्फे ताजुद्दीनबाबांचा जन्मोत्सव गांधीबाग येथील फवारा चौक येथे साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष इकबाल अहमद, मोबिन पटेल यांच्याहस्ते ५१ किलोचा केक कापण्यात आला. यावेळी हेमंत पुरजवार, अशफाक पटेल, अनिल बत्तीनवार, रूपेश आदमने, इसराईल खान, सारीक बगड आदी उपस्थित होते.