"मी कधीही पार्टी लाइनचे उल्लंघन केले नाही..."; शशी थरूर यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर बोलताना काँग्रेस हायकमांडवर नाराजी व्यक्त केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:34 IST2026-01-24T17:25:48+5:302026-01-24T17:34:12+5:30
काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी व्यासपीठावर त्यांचे नाव न घेतल्याने थरूर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. राज्यातील नेते देखील त्यांना वारंवार बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

"मी कधीही पार्टी लाइनचे उल्लंघन केले नाही..."; शशी थरूर यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर बोलताना काँग्रेस हायकमांडवर नाराजी व्यक्त केली
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मी काँग्रेस पक्षाच्या जाहीर भूमिकेचे कधीही उल्लंघन केले नसल्याचे सांगितले. थरुर म्हणाले की, त्यांचा एकमेव सार्वजनिक मतभेद, तत्वतः "ऑपरेशन सिंदूर" बद्दल होता. केरळ साहित्य महोत्सवाच्या सत्रादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना यावर स्पष्टीकरण दिले.
हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, थेट राज ठाकरेंनी घेतली दखल; अविनाश जाधवांना पाठवले
थरूर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरवर मी कडक भूमिका घेतली आहे आणि मला 'कोणताही पश्चात्ताप नाही'असंही थरुर यांनी सांगितले. यावेळी थरुर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'एक निरीक्षक आणि लेखक म्हणून मी पहलगाम घटनेनंतर वृत्तपत्रात एक स्तंभ लिहिला होता, यामध्ये शिक्षा आणि ठोस कारवाईसाठी युक्तिवाद केला होता. विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भारताने पाकिस्तानशी दीर्घकाळ टिकणारा संघर्ष टाळावा आणि कोणतीही कारवाई दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यापुरती मर्यादित असावी, असे ते म्हणाले.
काही दिवसांपासून शशी थरुर यांचे पक्ष नेतृत्वासोबत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर थरुर यांनी हे विधान केले. कोची येथे झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मंचावर उपस्थित असूनही त्यांचे नाव घेण्यास नकार दिल्याने थरूर नाराज होते आणि राज्यातील नेते त्यांना वारंवार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा चर्चा सुरू आहेत.
केवळ दहशतवादी ठिकाणांनाच मर्यादित आणि नियंत्रित पद्धतीने लक्ष्य केले पाहिजे, जेणेकरून भारत पाकिस्तानविरुद्ध नाही तर दहशतवादाविरुद्ध कारवाई करत आहे असा स्पष्ट संदेश मिळेल, असे मी सुचवले होते. ही कारवाई पाकिस्तानच्या दहशतवाद रोखण्याच्या अक्षमतेमुळे आणि अनिच्छेमुळे झाली आहे. शिवाय, मी असे म्हटले होते की पाकिस्तानला तणाव निर्माण करण्याची किंवा वाढवण्याची कोणतीही संधी देऊ नये, असंही थरुर म्हणाले.