केरळ मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार नाही : थरूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:08 IST2026-03-20T13:07:57+5:302026-03-20T13:08:23+5:30
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत थरूर यांनी आपण निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट करून राज्याच्या काेनाकोपऱ्यात जाऊन प्रचार करण्यासाठी आपण आतुर आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी ८५ ते १०० जागा मिळवू शकली तर उत्तमच, असेही त्यांनी नमूद केले.

केरळ मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार नाही : थरूर
नवी दिल्ली : “काँग्रेसकडूनकेरळच्या मुख्यमंत्रिपदाचा मी संभाव्य दावेदार नाही,” अशी स्पष्टोक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी दिली. मुख्यमंत्री आदर्श पद्धतीने निवडून आलेल्या आमदारांतून निवडले गेले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत थरूर यांनी आपण निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट करून राज्याच्या काेनाकोपऱ्यात जाऊन प्रचार करण्यासाठी आपण आतुर आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी ८५ ते १०० जागा मिळवू शकली तर उत्तमच, असेही त्यांनी नमूद केले.
‘पक्षचिन्ह महत्त्वाचे’
निवडणूक जवळ येत जाईल तसा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जनतेसमोर आणणे योग्य राहील, असे थरूर म्हणाले. एखाद्या नावाऐवजी केरळमध्ये एक भूमिका, मिशन हाती घेऊन पक्षचिन्हाच्या आधारे काँग्रेस अधिक चांगले निकाल
देऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला.
तर पक्षाने उमेदवार निवडीसंबंधी सर्व मुद्दे निकाली काढले असल्याचा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांनी केला.
भाजपची दुसरी यादी गुरुवारी भाजपने केरळमध्ये ३९ उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.