शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Kurnool Bus Fire Accident: भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:26 IST

Hyderabad-Bangalore Bus Accident: हैदराबाद-बंगळूर महामार्गावर भीषण दुर्घटना, बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

Kurnool Bus Fire Accident: हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एक मोठी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. ‘कावेरी ट्रॅव्हल्स’च्या खासगी स्लीपर कोच बसला एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. दुचाकीच्या धडकेमुळे बसच्या इंधन टाकीजवळ आग लागली आणि ती काही क्षणातच संपूर्ण बसमध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही.

बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने कर्नूल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत २० जणांनी जीव गमावला होता. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मुख्यमंत्री नायडूंकडून दुःख व्यक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "चिन्ना टेकुरजवळ झालेल्या बस अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत," असे त्यांनी समाजमाध्यमावर (X) पोस्ट करून सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Luxury bus crash kills 32 in Andhra Pradesh inferno.

Web Summary : A bus accident near Kurnool, Andhra Pradesh, killed 32 after a motorcycle collision ignited a fire. Passengers were asleep when the blaze erupted, trapping many. Some escaped via emergency exits. Injured are hospitalized. Chief Minister Naidu expressed grief and ordered assistance.
टॅग्स :AccidentअपघातfireआगAndhra Pradeshआंध्र प्रदेश