शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 08:42 IST

एक विवाहित तरुण आपल्या प्रेयसीसोबत फिरायला आला होता, मात्र चार दिवसांपासून त्याचा माग काढत असलेल्या पत्नीने त्याला तिथे गाठले. त्यानंतर भररस्त्यात जो काही राडा झाला..

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी गजबजलेल्या नैनीतालच्या निसर्गरम्य परिसरामध्ये  सोमवारी एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. गाझियाबादचा एक विवाहित तरुण आपल्या प्रेयसीसोबत फिरायला आला होता, मात्र चार दिवसांपासून त्याचा माग काढत असलेल्या पत्नीने त्याला तिथे गाठले. त्यानंतर भररस्त्यात जो काही राडा झाला, तो पाहून पर्यटकांच्याही काळजाचा ठोका चुकला. संतापलेल्या पत्नीने केवळ गोंधळच घातला नाही, तर पतीच्या कारच्या काचाही फोडून आपला संताप व्यक्त केला.

बोनेटवर बसली तरी काढली कार! 

गाझियाबादचा हा तरुण आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी नैनीतालला पोहोचला होता. दोघेही कारमधून फिरत असताना अचानक त्याची पत्नी तिथे पोहोचली . पत्नीला पाहताच पतीने कार पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेली पत्नी थेट कारच्या बोनेटवर जाऊन बसली. धक्कादायक बाब म्हणजे, बोनेटवर पत्नी असतानाही पतीने कार न थांबवता तशीच काही अंतरापर्यंत ओढत नेली. अखेर स्थानिकांनी मध्यस्थी करत ही कार थांबवली.

११ वर्षांचा संसार आणि 'वो'ची एन्ट्री 

कार थांबताच पत्नीचा संयम सुटला. तिने कारवर जोरदार प्रहार करत काचा फोडल्या. हा गोंधळ पाहून कारमध्ये असलेली गर्लफ्रेंड संधी मिळताच तिथून पसार झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या पती-पत्नीला पोलीस ठाण्यात नेले. तिथे पत्नीने आपल्या संसाराची व्यथा मांडली. तिने सांगितले की, त्यांचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले असून त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, पतीचे त्याच्या ऑफिसमधील एका मुलीशी प्रेमसंबंध असून तो अनेकदा तिला फसवून बाहेर फिरत असतो.

घटस्फोटाचा खटला आणि धमक्या 

पीडित पत्नीने पोलिसांना सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून नवरा घरातून गायब होता आणि तिचा फोनही उचलत नव्हता. पतीने तिला याआधीही अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्यात घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. "मला फक्त त्या मुलीला समोर आणून जाब विचारायचा आहे," अशी मागणी तिने पोलिसांकडे केली.

ही घटना घडली तेव्हा नैनीतालमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची मोठी गर्दी होती. या संपूर्ण ड्रामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी सध्या दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Confronts Husband with Girlfriend in Nainital, Chaos Ensues

Web Summary : In Nainital, a wife confronted her husband with his girlfriend, leading to a public scene. The enraged wife damaged his car after discovering his affair. The couple, married for 11 years, are in divorce proceedings following his infidelity. Police intervened, and investigations are ongoing.
टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारी