शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

हाउडी थायलंड, मिस्टर राहुल गांधी? मोदींवर टीका केल्यानंतर भाजपा नेत्याने लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 09:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती.

ठळक मुद्दे नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली होतीराहुल गांधी यांच्या त्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना  भाजपा नेते विजय चौथाईवाले यांनी 'हाउडी थाडलंड, मिस्टर राहुल गांधी? अशी विचारणा केली

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. आता राहुल गांधी यांच्या त्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना  भाजपा नेते विजय चौथाईवाले यांनी 'हाउडी थाडलंड, मिस्टर राहुल गांधी? अशी विचारणा केली आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नियोजित अमेरिका दौऱ्यामध्ये ह्युस्टन येथे 50 हजारहून अधिक भारतीयांना संबोधित करणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी ह्युस्टन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाल 'हाउडी मोदी' असे नाव दिले आहे. दरम्यान, खूप गाजावाजा होत असलेल्या या कार्यक्रमावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे मिस्टर मोदी. असं वाटतंय की अर्थव्यवस्थेची अवस्था काही बरोबर नाही, अशी टीका   राहुल गांधीं केली होती. त्याखाली 'हाउडी इकॉनॉमी हा हॅशटॅग दिला होता.''

दरम्यान, आज राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या या केलेल्या टीकेला भाजपाचे परराष्ट्र विषयक प्रभारी विजय चौथाईवाले यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. 'हाऊडी थायलंड, मिस्टर राहुल गांधी?' असा टोला त्यांनी लगावला आहे. विजय चौथाईवाले हे भाजपाचे परराष्ट्रविषयक विभागाचे प्रभारी आहेत. अनिवासी भारतीयांना भाजपाशी जोडून घेण्याचे काम ते करतात. जगभरात जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असतो तिथे हाती महिने आधी पोहोचून प्रचार करण्याचे काम ते करतात.  

ह्युस्टन येथे होणार हाउडी मोदी कार्यक्रम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. मात्र या संबोधनापूर्वी मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, या कार्यक्रमात मोदी  उपस्थित ५० हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसUnited Statesअमेरिका