शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील हॉटेल्सचे दर २०० टक्क्यांनी वाढले हाऊसफुल्ल गर्दी : आपचे देशभरातील कार्यकर्ते राजधानीत

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे.
पहाडगंज, करोलबागमधील हॉटेल्सचे सर्वसाधारण दर ५०० ते १२०० रुपये असून दिल्लीला भेटी देणारे पर्यटक स्वस्त दरांमुळे या भागातील हॉटेल्सला पसंती देत असतात, पण गेल्या दोन दिवसांत दर २५०० वर गेले आहेत. सध्या मुलांच्या परीक्षेचे दिवस असल्यामुळे हॉटेल्सचे दर ५०० ते ७०० रुपयांच्या घरात होते, मात्र अचानक गेल्या दोन दिवसांत भाव घसघशीत वाढले आहेत. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवासाची पक्षाने व्यवस्था केलेली नसून ती त्यांनी स्वत:च करावी असे सांगण्यात आले आहे. नेमके किती कार्यकर्ते येतील याचा अंदाज लावता येणे अशक्य आहे. देशभरातून किमान २० हजारांवर कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा असल्याचे आपच्या एका नेत्याने सांगितले.
---------------------
दलालांची चांदी....
दिल्ली रेल्वेस्थानकावर ग्राहकांना हेरून हॉटेलमध्ये खोल्यांची व्यवस्था करणाऱ्या एजंट लोकांचीही कमाई अचानक वाढली आहे. काहींनी तर महिनाभर काम नाही मिळाले तरी चालेल एवढी कमाई दोनच दिवसांत झाल्याची कबुली दिली आहे.
------------------
कोट
माझ्या हॉटेलमध्ये बारा खोल्या असून त्यातील एकही रिकामी नाही. याआधी दर ७०० रुपये होता. आता १५०० रुपये दर आकारला आहे.
- पहाडगंजमधील एक हॉटेलमालक.