गुजरात निवडणुकीत काँग्रेसला आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:19 AM2021-10-19T06:19:10+5:302021-10-19T06:19:51+5:30

आप, टीएमसीला पूर्णपणे अपयशी सिद्ध व्हावे लागेल

Hope for Congress in Gujarat elections | गुजरात निवडणुकीत काँग्रेसला आशा

गुजरात निवडणुकीत काँग्रेसला आशा

Next

- व्यंकटेश केसरी 

नवी दिल्ली : पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि आम आदमी पक्ष (आप) पूर्णपणे अपयशी सिद्ध झाले, तर गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत काही आश्चर्यचकित करणारे घडेल, अशी राज्य काँग्रेसला आशा आहे.

गुजरातमध्ये आगामी निवडणूक बहुरंगी असेल. स्थानिक नेते आणि सत्ताधारी पक्षाबद्दलच्या नाराजीमुळे महत्त्वाच्या पक्षांतून लोक इतर पक्षांत जातील. याशिवाय आपचा आणि राज्यातील निवडणुकीत संभाव्य प्रवेश होणाऱ्या टीएमसीचा किती प्रभाव असेल हे कोणालाही माहीत नाही,” असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदाराने नाव न सांगण्याच्या अटींवर म्हटले. आप कोणत्याही स्वरुपात भाजपविरोधात काँग्रेससोबत काम करणार नाही, हे त्याचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात स्वबळावर लढण्याच्या केलेल्या घोषणेतून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेल्या टीएमसीने गोव्यात निवडणूक गांभीर्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या शेजारच्या राज्यांत (आसाम आणि त्रिपुरा) टीएमसी लक्ष घालेल, असा समज होता. त्याविरोधात हा निर्णय झाला आहे.  बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात भाजपला आव्हान द्यावे, अशी गुजरात काँग्रेसमधील एका गटाची इच्छा आहे. यातून अनेक काँग्रेस नेते टीएमसीत दाखल होतील, असे संकेत आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गुजरातकडे लक्ष नसले तरी आप आणि टीएमसीच्या राज्यातील प्रवेशाने काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीला धक्का बसू शकतो, असे काँग्रेसमधील अंतर्गत नेते मान्य करतात. 

स्वातंत्र्य दिल्यास...
हृतिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना टीम उभी करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास भाजपला काँग्रेस चांगली लढत देऊ शकेल. गुजरातमध्ये निवडणूक लढवली जाईल, असा जात हा काही एकमेव घटक नाही, तर धर्मदेखील मतदारांना एकत्र आणणारा आहे. २०१५ मधील निवडणुकीत जीएसटी, नोटाबंदी आणि सामाजिक एकीकरणाने काँग्रेसला मदत केली होती.

Web Title: Hope for Congress in Gujarat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.