अपंग कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:11+5:302014-12-25T22:41:11+5:30

नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत नागपूरच्या अपंग कर्मचाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे.

High court relief to the handicapped employee | अपंग कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा

अपंग कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा

गपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत नागपूरच्या अपंग कर्मचाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे.
अमूल्य पाटील असे कर्मचाऱ्याचे नाव असून ते कार्यालय सहायक आहेत. त्यांची २००७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. विद्यापीठात शाखा सहायकाची २१ पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय झाला होता. तीन टक्के पदे अपंग कर्मचाऱ्यांसाठी राखीव होती. पाटील यांनी अर्ज केला होता. परंतु, टंकलेखन प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी संगणकाची एमएस ऑफिस व एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण केले आहे. ते संगणकावर कार्य करू शकतात. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने पाटील यांना पदोन्नती देण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.

Web Title: High court relief to the handicapped employee