शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 18:17 IST

Video - उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरला अचानक हार्ट अटॅक आला.

जेवताना, जिममध्ये व्यायाम करताना, डान्स करताना, फिरताना, चालताना हार्ट अटॅक येत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

वाहिद हुसेन असं हार्ट अटॅक आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. व्हिडिओमध्ये डॉक्टर अचानक खाली कोसळले आणि जमिनीवर पडले, तेव्हा ते त्यांच्या क्लिनिकबाहेर उभे असल्याचं दिसून आलं आहे. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली आणि डॉक्टरचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही.

क्लिनिकबाहेरच खाली पडल्यानंतर लगेचच डॉक्टरचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे, ज्यामध्ये डॉक्टर खाली कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. डॉ. वाहिद हुसेनच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डॉक्टरच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर खूप चांगल्या स्वभावाचे होते आणि ते खूप प्रसिद्ध डॉक्टर होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसेच आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या असा सल्ला देखील दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor Collapses, Dies of Heart Attack Outside Clinic in UP

Web Summary : A doctor in Hapur, Uttar Pradesh, Wahid Hussain, died of a sudden heart attack outside his clinic. He collapsed, and despite immediate assistance, he could not be saved. The incident, captured on CCTV, has shocked the community.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHeart Attackहृदयविकाराचा झटकाdoctorडॉक्टरDeathमृत्यू