शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात नगरपालिका निवडणुकीत मुस्लीम मतदार भाजपकडे वळला, पक्षाचा विजय पक्का केला! आकडे बघून थक्क व्हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:00 IST

महत्वाचे म्हणजे, १८ फेब्रुवारीला जो निकाल आला, त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आणि ती म्हणजे, आता गुजरातमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

गुजरातमध्ये नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) प्रचंड मोठा विजय मिळाला. महत्वाचे म्हणजे, १८ फेब्रुवारीला जो निकाल आला, त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आणि ती म्हणजे, आता गुजरातमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नगरपालिका, नगर परिषदा तसेच जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या २,१७१ पैकी १,६०८ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.

या निकालांतून एक महत्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे, ६६ नगरपालिकांमध्ये भाजपच्या तिकिटांवर मुस्लीम उमेदवारांच्या विजयात विक्रमी वाढ झाली आहे. याच बरोबर, ज्या जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहे, तिथेही भाजपने आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

2018 च्या तुलनेत 2025 मध्ये मुस्लीम उमेदवारांच्या विजयात वाढ -या नगरपालिकांमध्ये २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटांवर ४६ मुस्लीम उमेदवार विजयी झाले होते. यावर्षी मात्र ही संख्या ७६ पर्यंत वाढली आहे. यांत ३३ महिलांचाही समावेश आहे. पक्षाने एकूण १०३ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. महत्वाचे म्हणजे, पाटण, खेडा, पंचमहल आणि जुनागढ जिल्ह्यातील नगरपालिकांमधूनही अनेक उमेदवार विजयी झाले आहेत, जेथे गेल्या निवडणुकीत भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी जाला नव्हता.२०१८ मध्ये, नगरपालिकांमध्ये २५२ मुस्लीम उमेदवार निवडून आले होते. ही संख्या आता २७५ पर्यंत वाढली आहे. यात काँग्रेसचा वाटा ३९ टक्के, भाजपचा २८ टक्के तर आम आदमी पक्षाचा (आप) वाटा ४.७ टक्के आहे. 'आप'चे १३ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. यात जामनगरच्या सलाया नगरपालिकेचाही समावेश आहे, तेथे ११ उमेदवार विजयी झाले.

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातElectionनिवडणूक 2024