शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

Siddaramaiah : "काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपाने 'आप'ला निधी दिला"; सिद्धरमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:39 IST

Siddaramaiah : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपावर काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला निधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, जिथे भाजपा पुन्हा एकदा गुजरातमध्ये प्रचंड बहुमताने आपले सरकार बनवताना दिसत आहे. एकीकडे देशभरातील भाजपा कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षांचे नेते सातत्याने भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी भाजपावर काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला निधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सिद्धरमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.

गुजरातमधील निकालानंतर सिद्धरमय्या यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपाने गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (आप) निधी दिला आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले. "आपने गुजरातमध्ये खूप खर्च केला. माझी माहिती सांगते की, भाजपाने काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला पैसे दिले, कारण आपने निवडणुका लढल्या, आम्ही मागे राहिलो." 

"नवीन पक्षाला 10 टक्के मते मिळाली, त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये घट झाली. आपने निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च केला. त्यांनी काँग्रेसपेक्षा जास्त खर्च केला. तरीही ते सहा जागांवर आघाडीवर आहेत" असं देखील सिद्धरमय्या यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुजरातमधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. पोकळ आश्‍वासने आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे असं म्हणत आप आणि काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी विकासाचे राजकारण करणाऱ्या मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला असं म्हणत विजयानंतर गुजरातच्या जनतेचे आभारही मानले आहेत.

"पोकळ आश्‍वासने देणाऱ्यांना जनतेने नाकारले अन्..."; ऐतिहासिक विजयानंतर अमित शाहांची प्रतिक्रिया

अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा 184 पैकी 158 जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. अमित शाह यांनी "गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप