टोलमुक्तीसाठी सरकारकडून जनतेची दिशाभूल - पाटील

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:24+5:302015-03-14T23:45:24+5:30

अनगर :

The government is misguided for the toll empowerment - Patil | टोलमुक्तीसाठी सरकारकडून जनतेची दिशाभूल - पाटील

टोलमुक्तीसाठी सरकारकडून जनतेची दिशाभूल - पाटील

गर :
भाजपचे आघाडी सरकार राज्यात सत्तेवर येताच टोलमुक्तीबाबत सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आता केवळ चारचाकी वाहनांनाच टोलमुक्ती देण्याचा प्रयत्न करीत असून, लहान-सहान चारचाकी वाहनांना या टोलमधून वगळून त्याचा अधिभार जडमाल वाहतूक करणार्‍या वाहनांवर लावण्याचा सध्या सरकार प्रयत्न करीत असून, याचा सर्वात मोठा फटका शेतीमालाची वाहतूक करणार्‍या वाहनांना म्हणजेच पर्यायाने कष्टकरी शेतकर्‍यांनाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बसणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांनी लोकनेते कारखान्यावर झालेल्या शेतकरी सहविचार चर्चेच्या बैठकीत गुरुवारी केले.
यावेळी कृषिभूषण दादा बोडके, प्रगतिशील बागायतदार डॉ. सुभाष गुजरे, मुरलीधर गुंड, अंकुश गुंड, सुनील घाटुळे, राम कदम, हरी गुंड, रामलिंग माळी, भागवत शिंदे, विठ्ठल कारंडे, किसन गुंड, सज्जन खोत, नारायण गुंड, संभाजी थिटे आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार केवळ उच्चभ्रू, र्शीमंत, धनिकांच्या चारचाकी वाहनांचीच काळजी घेत असून, दुसरीकडे मात्र शेतीमालाच्या वाहतुकीवर प्रपंच असणार्‍या शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करून देशोधडीला लावण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हणाले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक सज्जन पाटील, अनगरचे उपसरपंच शहाजी गुंड, बालाजी पासले, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हेमंत गरड, र्शीकांत गायकवाड, शशी पाटील, कुंदन धोत्रे, चंद्रकांत देवकते, शामराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The government is misguided for the toll empowerment - Patil