पाॅडकाॅस्ट कंपन्यांमधील चिनी गुंतवणुकीवर सरकारची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 03:20 AM2020-11-24T03:20:49+5:302020-11-24T03:21:22+5:30

प्रादेशिक भाषांमध्येही वापर- टेंसंट, शेनवई कॅपिटलचा समावेश

Government eye on Chinese investment in podcast companies | पाॅडकाॅस्ट कंपन्यांमधील चिनी गुंतवणुकीवर सरकारची नजर

पाॅडकाॅस्ट कंपन्यांमधील चिनी गुंतवणुकीवर सरकारची नजर

Next

टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : लडाख सीमेवर भारत- चीनचे सैन्य आमने- सामने असताना भारतीय पाॅडकाॅस्टच्या बाजारात चिनी कंपन्यांनी थोडीथोडकी नव्हे, तर ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.  माहिती सुरक्षितता, गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने २०० पेक्षा जास्त चिनी ॲपवर बंदी घातली; परंतु देशाच्या ग्रामीण भागात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या पाॅडकाॅस्ट ॲपमध्ये चिनी गुंतवणूक वाढते आहे. अद्याप दुर्लक्षित राहिलेली ही गुंतवणूकदेखील केंद्र सरकारच्या रडारवर आली आहे. या गुंतवणुकीची माहिती जमवण्याचे निर्देश मंत्रालयातील वरिष्ठांनी दिल्याचा दावा सूत्रांनी केला.

भारतीय हद्दीत घुसखोरीचा चीनचा मनसुबा भारतीय जवानांनी उधळला. जूनमध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात २० जवान शहीद झाले. चीनने मारल्या गेलेल्या सैनिकांचा आकडा अद्याप जगापासून लपवला आहे. चकमकीनंतर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेत चीनला चांगलेच कोंडीत पकडले. चिनी गुंतवणूक रोखण्यापासून ते चिनी कंपन्यांना विकासकामांमध्ये सहभागी होऊ न देण्यापर्यंत भारताने चिनी ड्रॅगनला धडा शिकवला. यूसी ब्राऊझर, टिकटाॅकसारख्या लोकप्रिय ॲपवरही केंद्र सरकारने बंदी घातली. मात्र, पाॅडकाॅस्टमधील गुंतवणूक वाढलीच आहे. प्रतिलिपी या ॲपमध्ये चीनच्या टेन्संट कंपनीची गुंतवणूक आहे. भारतात सध्या टेन्संट, वुई चॅट ॲपवर बंदी आहे. कुलू एफएम, पाॅकेट एफएम, हेडफोन या पाॅडकाॅस्ट कंपन्यांनमध्ये चीनच्या टेंसंट, चिमिंग वेंचर पार्टनर्स, शनवेई कॅपिटल, टेंंसंट क्लाऊड, फोसन आरझेड कॅपिटल या कंपन्यांची गुंतवणूक आहे.

मार्केटमध्ये हजार कोटींची होतेय उलाढाल
n    भारतीय पाॅडकाॅस्ट मार्केटमध्ये १ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. प्राईसवाॅटरहाऊस कूपर्सच्या अहवालानुसार भारतात पाॅडकाॅस्ट ऐकणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत सर्वाधिक गतीने वाढते आहे. 
n    दरमहा भारतात ५० लाख लोक पाॅडकाॅस्टचा नियमित वापर करतात. हा आकडा सातत्याने वाढतो आहे. मराठीतही पाॅडकाॅस्ट वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रादेशिक भाषांचाही त्यात समावेश आहे. 

२०११ साली एका मिनिटाला भारतात ४२ जण पाॅडकाॅस्ट वापरत होते. पाच वर्षांनी (२०१६) हा आकडा २३४ वर गेला, तर २०२१ साली हा आकडा ५३६ वर जाण्याची शक्यता आहे. इंग्रजी भाषेत एका मिनिटात पाॅडकाॅस्ट वापरणाऱ्यांची संख्या २०२१ साली १९९ वर जाण्याची आकडेवारी स्टॅटिस्टाने प्रसिद्ध केली आहे.

Web Title: Government eye on Chinese investment in podcast companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.