शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत सरकारची पुन्हा एकदा नाचक्की

By admin | Updated: March 13, 2015 23:11 IST

संसदेत सरकारची पुन्हा एकदा नाचक्की झाली. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेत एकजूट झालेल्या विरोधकांनी

नवी दिल्ली : संसदेत सरकारची पुन्हा एकदा नाचक्की झाली. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेत एकजूट झालेल्या विरोधकांनी शुक्रवारी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आणि सरकारला विरोधकांपुढे नतमस्तक होऊन ही चर्चा सोमवारपर्यंत स्थगित करावी लागली.याआधी मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधकांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाबाबतची आपली एक दुरुस्ती पारित करवून घेत सरकारची नाचक्की केली होती. लोकसभेत शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार होती; परंतु जेटली विदेशात असल्याकारणाने त्यांच्या गैरहजेरीत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेण्यास विरोधकांनी स्पष्ट नकार दिला आणि ही चर्चा सोमवारपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली. विरोधी पक्ष आपल्या मागणीवर ठाम असल्याचे पाहून संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘जेटली हे ब्रिटन सरकारच्या निमंत्रणावरून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी लंडनला गेले आहेत. वित्तमंत्र्यांच्या गैरहजेरीत चर्चेत भाग घेण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर जे तयार आहेत, त्यांना या चर्चेत भाग घेण्याची परवानगी दिली जावी आणि वित्तमंत्री आल्यानंतर काँग्रेस या चर्चेत भाग घेऊ शकेल.’ सभागृहातील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नायडूंची ही सूचना फेटाळली. ते म्हणाले, ‘आता मात्र हद्दच झाली आहे. हे लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे.’तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनीही नायडूंच्या सूचनेवर तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे आणि या पक्षाशिवाय चर्चा करणे अनुचित आहे. चर्चेची सुरुवात काँग्रेसकडूनच झाली पाहिजे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)