Godavari boat tragedy No regulatory agency to control water transport | जल वाहतूक ठरतेय जीवघेणी! बोट दुर्घटनेत तब्बल 10 हजार 580 जणांचा मृत्यू
जल वाहतूक ठरतेय जीवघेणी! बोट दुर्घटनेत तब्बल 10 हजार 580 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देभारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. 2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे.

विजयवाडा - आंध्र प्रदेशमध्ये गोदीवरी नदीत प्रवासी बोट उलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी ही दुर्घटना घडली. बुडालेल्या बोटीतील 40 प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातील सांगली जिल्हातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण 17 जणांचा मृत्यू झाला होता. भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. National Crime Records Bureau (NCRB) ने याबाबत माहिती दिली आहे. 

Several People Feared Drowned In Tourist Boat In The Swollen Godavari River In Andhra Pradesh | अमरावतीत बोट उलटल्यानं 11 जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी बेपत्ता

2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. यामध्ये 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड या राज्यात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बोट दुर्घटनेत उत्तर प्रदेशात 1753, मध्य प्रदेश 1665, बिहार 1216, छत्तीसगड 864, तामिळनाडू 630, कर्नाटक 447, ओडीसा 386, केरळ 360 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे, लाईफ जॅकेट नसणे, विनापरवाना बोट चालवणे या गोष्टींमुळे बोट दुर्घटना घडत असल्याचं समोर येत आहे. आंध्र प्रदेशमधील बोट दुर्घटनेबाबत आंध्र प्रदेश आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये असलेल्या 61 प्रवाशांपैकी 50 जण पर्यटक होते. तर अन्य 11 जण हे बोटीवरील कर्मचारी होते. गोदावरी नदीजवळील पपीकोंडालू हिलचा नजारा पाहण्यासाठी ही मंडळी सहलीसाठी गेली होती. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहून किनारा गाठला. यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 
 


Web Title: Godavari boat tragedy No regulatory agency to control water transport
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.