शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी हायकोर्टातच जा

By admin | Updated: September 20, 2016 05:55 IST

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्याचे आदेश सोमवारी पाटील यांना दिले.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्या याचिकेच्या सुनावणीत, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्याचे आदेश सोमवारी पाटील यांना दिले. येत्या ४८ तासांत उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली जाईल, असे विनोद पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेले आंदोलन कधीही उग्र स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे याचिकेची त्वरित सुनावणी होणे गरजेचे आहे, असा आग्रह पाटील यांचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी धरला. त्यावर महाराष्ट्र सरकारचे मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी महाराष्ट्र सरकार सहकार्य करण्यास तयार आहे, असे सांगितले. पाटील नंतर म्हणाले की, राज्य सरकारनेच मराठा आरक्षणाच्या याचिकेची जलदगतीने सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात यायला हवे होते. सत्ता हाती येताच मराठा आरक्षणाबाबत तोडगा शोधून काढू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारसभांमधे देत होते. आता तरी त्यांनी आपल्या आश्वासनाला जागावे. हरीश साळवेंचे सहायक व पाटील यांचे वकील अ‍ॅड. हरिहरसिंग म्हणाले की, आम्ही ४८ तासात नवी याचिका उच्च न्यायालयात दाखल करीत आहोत. अ‍ॅड. निशांत कातनेश्वरकर म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. याचिकाकर्त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. हायकोर्टाने सदर याचिका जलदगतीने निकाली काढावी, यासाठी महाराष्ट्र सरकार पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी वकिलांसह आवश्यक ती सारी कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)>हायकोर्ट विचार करेलसुप्रीम कोर्टाने आदेश देताना सांगितले की पाटील यांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल करावी, गुणवत्तेच्या निकषांवर हायकोर्ट तिचा अवश्य विचार करेल. याचिकेची लवकर सुनावणी व्हावी, असे आमच्यातर्फे उच्च न्यायालयाला कळवले जाईल.