नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:41 IST2024-11-07T17:39:46+5:302024-11-07T17:41:15+5:30

लग्नाची तयारी सुरू होती पण नवरदेव वरात घेऊन आलाच नाही.

girl left husband marriage fixed with lover she was ready as bride but groom did not come wedding | नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...

नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची तयारी सुरू होती पण नवरदेव वरात घेऊन आलाच नाही. नवरदेवाने हुंडा म्हणून कार मागितली असल्याचं सांगण्यात येत आहे. हा प्रकार वधूला समजताच ती बेशुद्ध झाली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

नखासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहितेचं त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. महिलेच्या पतीला हे प्रेमप्रकरण कळताच त्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी मुलीच्या आईने प्रियकर सलीमसोबत तिला रंगेहाथ पकडलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं.

पंचायतीने तरुणी आणि बॉयफ्रेंडच्या लग्नाची तारीख ५ नोव्हेंबर ही निश्चित केली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी लग्नाची तयारी सुरू केली. मुलीचे वडील आणि नातेवाईकांनीही लग्नाच्या वरातीसाठी तयारी केली होती. लग्नात ३०० पाहुण्यांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

नवरी लग्नासाठी नटून-थटून तयार झाली होती. सर्वजण लग्नाच्या वरातीची आतुरतेने वाट पाहत होते. पण त्याच दरम्यान त्यांना लग्नाची वरात येत नसल्याचं समजलं. यानंतर आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. नवऱ्याने हुंड्यात केलेली गाडीची मागणी पूर्ण न झाल्याने वरानेच लग्नाची वरात आणण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलं. 

हे समजताच वधू बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं. जिथे डॉक्टरांनी मुलीला उपचारासाठी दाखल केलं. पाहुणे देखील न जेवताच परत गेले. या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. तरुणावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वधू पक्षाने केली आहे.
 

Web Title: girl left husband marriage fixed with lover she was ready as bride but groom did not come wedding

टॅग्स :marriageलग्न