शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:05 IST

अभिषेक नावाचा तरुण नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला, पण नंतर त्याच्यासोबत आक्रित घडलं .

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक नावाचा तरुण नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला, पण नंतर त्याच्यासोबत आक्रित घडलं . तरुण बाहेर आला नाही म्हणून कुटुंबाने बाथरूमचा दरवाजा तोडला तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण गॅस गिझरमधून बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साइडला असल्याचं सांगितल, ज्यामुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला.

बागपतच्या सुनहेडा गावात हृदयद्रावक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. घराच्या बाथरूममधील गॅस गिझरमुळे काही मिनिटांतच अभिषेकने जीव गमावला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अभिषेक नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला. दार बंद केलं, पण बराच वेळ झाला तरी आतून कोणताही आवाज न आल्याने कुटुंब चिंतेत पडलं. त्यांनी हाक मारली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

कुटुंबीयांनी दरवाजा तोडला आणि आतील दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. अभिषेक बेशुद्ध अवस्थेत पडला होता. उपचारासाठी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांच्या मते, जेव्हा गॅस गीझर चालू असतो तेव्हा त्यातून कार्बन मोनोऑक्साइड नावाचा धोकादायक वायू तयार होतो, जो दिसत नाही आणि वासही येत नाही नसतो. मात्र, तो फुफ्फुसातील ऑक्सिजन वेगाने कमी करतो.

डॉक्टरांचे म्हणणं आहे की, बंद बाथरूममध्ये गॅस गीझर सुरू ठेवणं अत्यंत धोकादायक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की, गॅस गीझरबाबत थोडासाही निष्काळजीपणा देखील प्राणघातक ठरू शकतो. सीएचसीचे अधीक्षक ताहिर बेग यांनी सांगितलं की, आंघोळ करताना गिझरमुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Bathing turns fatal as gas geyser becomes silent killer.

Web Summary : In Baghpat, a young man died in the bathroom due to carbon monoxide poisoning from a gas geyser. The family found him unconscious after he didn't respond. Doctors warn against using gas geysers in closed bathrooms due to the risk of carbon monoxide poisoning.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू