दिल्लीत कारमध्ये सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: September 18, 2014 01:40 IST2014-09-18T01:40:49+5:302014-09-18T01:40:49+5:30

दिल्लीत एका 23 वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Gang rape in car in Delhi | दिल्लीत कारमध्ये सामूहिक बलात्कार

दिल्लीत कारमध्ये सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : दिल्लीत एका 23 वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी या तरुणीला एका निजर्नस्थळी फेकून दिले. ही तरुणी बेशुद्धावस्थेत दक्षिण दिल्लीच्या नेहरू प्लेस भागात आढळून आली.
मंगळवारी रात्री ही घटना घडली. पीडित तरुणीची आई दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला शीतपेयामधून गुंगी आणणारा पदार्थ दिला आणि ती बेशुद्ध पडल्यावर कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाले. 
नेहरू प्लेस मार्गावर एक तरुणी बेशुद्धावस्थेत पडली असल्याचे एका ऑटोरिक्षा चालकाला दिसताच त्याने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लगेच तरुणीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आरोपींमध्ये एक जण पीडितेचा मित्र आहे तर अन्य दोन त्याचे मित्र आहेत. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Gang rape in car in Delhi