शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 08:40 IST

ईशान्य दिल्लीतील दयालपूर पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एक इमारत कोसळली.

ईशान्य दिल्लीतील दयालपूर पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एक इमारत कोसळून मोठा अपघात झाला. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास, येथील शक्ती विहार परिसरात असलेली एक चार मजली इमारत कोसळली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

इमारत कोसळली तेव्हा सुमारे २४ जण  ढिगाऱ्याखाली अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. चांदनी, दानिश, रेश्मा आणि नवीद अशी मृतांची नावे आहेत. सध्या १८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे.

भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश

एनडीआरएफ, डॉग स्क्वॉड, दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या टीम मदत आणि बचाव कार्य करत आहेत. इमारत जुनी किंवा जीर्ण नव्हती, चांगल्या स्थितीत होती, परंतु भूखंड 'एल' आकारात होता जो इमारत कोसळण्याचे कारण असू शकतो, असं सांगण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,'आम्हाला पहाटे २:५० वाजता घर कोसळल्याची माहिती मिळाली. ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला आढळले की संपूर्ण इमारत कोसळली होती आणि लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.

टॅग्स :delhiदिल्ली