शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

'देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरुर बनेल'; RAW च्या माजी प्रमुखांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:20 IST

दुल्लत यांनी देशाचा पुढला पंतप्रधान मराठा होईल, असं भाकित व्यक्त केलंय...

नवी दिल्ली:भारताचा पुढील पंतप्रधान शीख बनेल. जर शीख  पंतप्रधान नाही झाला तर मराठा नक्कीच देशाचा पंतप्रधान बनेल, असं वक्तव्य RAW चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत (amarjeet dullat) यांनी केलंय. त्यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी दुल्लत यांनी हे वक्तव्य केलं. पुण्यातील सरहद संस्थेतर्फे (sarhad institute pune) संत नामदेव पुरस्कार सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पार पडला. यावेळी बोलताना दुल्लत यांनी देशाचा पुढला पंतप्रधान मराठा होईल, असं भाकित व्यक्त केलंय.

अमरजीतसिंह दुल्लत पुढे बोलताना म्हणाले, 'संत नामदेव महाराजांचं काम विश्वव्यापी आहे. आपल्याला देशासाठी संत नामदेव शोधावा लागणार आहे. अशा महान संताच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे.'

सरहद संस्थेतर्फे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक (satyapal malik) आणि रॉ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुल्लत यांना संत नामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता पण काही कारणास्तव ते सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

सरहद संस्थेतर्फे संत नामदेव पुरस्कार हा सीमावर्ती भागातील अशा लोकांशी महाराष्ट्राचे नाते जोडण्यासाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. तेराव्या शतकातील संत-कवी नामदेव यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. संत नामदेवांना शिख धर्मात मानाचे स्थान आहे संत नामदेव यांनी 23 वर्षे पंजाबमध्ये राहून तेथील लोकांना भक्ती संप्रदायाची शिकवण दिली. नामदेवांनी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आपला देह ठेवला असे मानले जाते. कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय राष्ट्रीय कार्याबद्दल रुपये एक लाख एक हजार रोख आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दिला जातो.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतSharad Pawarशरद पवारFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाSarhadसरहद संस्था