शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 1:46 PM

Former Gujarat CM Keshubhai Patel passes away : गेल्या काही दिवसांपूर्वी केशुभाई पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती.

ठळक मुद्देकेशुभाई पटेल यांनी दोनदा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ते १९९५ आणि १९९८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते.

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गुरुवारी सकाळी केशुभाई पटेल यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपूर्वी केशुभाई पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केशुभाई पटेल यांच्या कुटुंबीयांशी बोलून दुःख व्यक्त केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी केशुभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

केशुभाई पटेल यांचा जन्म २४ जुलै १९२८ ला जुनागड येथे झाला होता. अगदी लहान वयातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले होते. त्यानंतर ते जनसंघ आणि त्यानंतर भाजपासोबत बराच काळ राजकारणात राहिले.

दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीकेशुभाई पटेल यांनी दोनदा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ते १९९५ आणि १९९८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, २००१ मध्ये त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, दोन्ही वेळा केशुभाई पटेल यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याशिवाय, केशुभाई पटेल यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्रीपदही सांभाळले होते. २००१ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि २०१४ पर्यंत राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले.

गुजरातमधील भाजपाचे दिग्गज नेताकेशुभाई पटेल हे गुजरातमधील भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. त्यांनी जनसंघापासून पक्षासाठी काम केले होते. राज्यात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केशुभाई पटेल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केशुभाई पटेल यांच्यासोबत बराच काळ काम केले आणि अनेकदा नरेंद्र मोदी हे केशुभाई पटेल यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. दरम्यान, भाजपामधील मतभेदांमुळे केशुभाई पटेल यांनी २०१२ मध्ये आपला नवीन पक्ष स्थापन केला होता. गुजरात परिवर्तन पार्टी असे या पक्षाला नाव देण्यात आले. मात्र, २०१४ मध्ये केशुभाई पटेल यांनी पुन्हा आपला पक्ष भाजपामध्ये विलीन केला.

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपा