शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरत्या एन-ए वर प्लॉटींगची धडका विक्री

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

लक्ष्मणराव सिरफुलेच्या शेतात रात्रीतूनच केला रस्ता, कोर्टात धाव

लक्ष्मणराव सिरफुलेच्या शेतात रात्रीतूनच केला रस्ता, कोर्टात धाव
हदगाव : नगरपालिकेच्या हद्दीतील प्लॉटींगचे एन.ए. जिल्हाधिकारी कार्यालयातून करायचे असतात तर ग्रामीण भागातील एन.ए. तहसील कार्यालयातून परंतु सदर मंडळीने तहसीलमधून तात्पुरते एन.ए. काढून त्यावरच विक्री केली आहे. नंतर मुदत संपल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेतलेलीच नाही.
ग्रामीण हद्दीतील कौठा, डोंगरगाव, गोजेगाव भानेगाव आदी ठिकाणावरील प्लॉटींग विक्रीसाठी तहसील कार्यालयातून एन.ए. घेता येतात तर नगरपालिकेच्या हद्दीतील एन.ए.साठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्याऐवजी तात्पुरता एन.ए. तहसील कार्यालयातून ६ महिन्यासाठी घेतला जातो. यासाठी खरेदीखत करुन घेण्यासाठी चोहोबाजुने २० फुटाचे रस्ते दाखविले. १०० फूट रोडच्या जागेवरच ३०/५० ची दोन मजली भव्य इमारत उभारली आहे.
तात्पुरते एन.ए. दाखवून नियमावलीत राहते घर, लाईट, पाणी, रस्ते, मोकळी जागा दाखवून शासनाचा महसूल बुडविला जातो. एका बिल्डरने गट ५२/५३/२७ मध्ये शेतकरी लक्ष्मणराव सिरफुले यांच्या पिक असलेल्या शेतामध्ये मध्यरात्री मुरुम आणून रस्ता केला. मासिक हप्त्यावर प्लॉटींग विक्री सुरू केली. या शेतकर्‍याने सदरचा रस्ता पाऊलवाड असल्याचे निदर्शनास आणून दिले. केलेला रस्ता उखडून टाकला. त्यामुळे बिल्डरला चांगलीच अडचण आली आहे.
ग्रामीण भागातील प्लॉटींग खरेदी केल्याने बांधकाम परवानगीसाठी ग्रामसेवक अडवणूक करतात. त्यांच्या सोबतीला लोकप्रतिनिधीही असतात. फुकटची कटकट नको म्हणून ग्राहक जमेल तर चिरीमिरी देऊन मोकळा होतो. अथवा लफडे नको म्हणून गप्प बसतो. असा हा तोंड दाबून बुक्याचा मार सुरू असतो.
या प्लॉटींग विक्री योजनेसोबत लक्कीड्रॉ असतो. दर महिन्याला हा ड्रॉ करण्यात येतो. यामध्ये एका ग्राहकाला मासिक हप्त्यामध्येच प्लॉट मिळतो. एक ड्रॉ सोडून दुसर्‍या सोडतला १ फ्री प्लॉट दिला जातो. त्यामुळे ग्राहक लालचेमध्ये येतो. ग्राहकाची गर्दी होते. जाहिरातीमध्ये माहूर देवस्थान जवळ आहे. शाळा जवळ आहे. बाजारपेठ, दवाखाना जवळ असल्याचे रंगीतचित्र दाखविण्यात येतात तर प्रतिष्ठीत मंडळीच्या नावे चार दोन प्लॉट दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाते.---------- अपूर्ण------