शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:42 IST

Bihar Assembly Election 2025 Result: भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेऊनही त्यांच्या मतांची टक्केवारी राजदपेक्षा कमी आहे. ही किमया आपल्या निवडणूक पद्धतीची आहे.

पाटणा - भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेऊनही त्यांच्या मतांची टक्केवारी राजदपेक्षा कमी आहे. ही किमया आपल्या निवडणूक पद्धतीची आहे. भाजपला २०.९० टक्के मते मिळाली आहेत. तर राजदची मतांची टक्केवारी २२.७६ टक्के आहे. भाजपला सुमारे टक्के कमी आहेत. दुसऱ्या क्रमांकावरच्या जदयूची टक्केवारी १८.९२ टक्के इतकी आहे. जी राजदच्या तुलनेत सुमारे चार टक्क्याने कमी आहे. 

सर्वाधिक मते असतील तो विजयी, टक्केवारी नाही भारतामध्ये 'फर्स्ट पास्ट द पोस्ट' अशी निवडणूक पद्धती आहे. या पद्धतीनुसार एखाद्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली म्हणजे तो सत्तेवर येतो असे नाही तर ज्या मतदारसंघात एखाद्या पक्षाचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येतो तो विजयी घोषित होतो. अगदी त्या उमेदवाराला ५० टक्क्यापेक्षा कमी मते मिळाली तरी तो विजयी ठरू शकतो. बिहार निवडणुकांत राजदला भाजपपेक्षा जास्त मते मिळाली असली तरी राजदच्या उमेदवाराला अनेक मतदारसंघात भाजप, जदयूच्या उमेदवारापेक्षा कमी मते पडली आहेत. त्यामुळे त्यांना कमी जागा मिळाल्या आहेत. तर भाजप जास्त आघाडीवर आहे कारण त्यांनी अनेक मतदारसंघात थोड्या-बहुत फरकाने राजद, काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. तसेच जदयूचेही आहे.

‘नोटा’ पर्यायाचे प्रमाण किंचित वाढले नवी दिल्ली : यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये ‘नोटा’चा (नन ऑफ दी अबॉव्ह) पर्याय निवडणाऱ्यांचे प्रमाण १.८१ टक्के म्हणजे ६,६५,८७० मते इतके होते. हे मागील विधानसभा निवडणुकांपेक्षा अधिक आहे. पण २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत कमी आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : First-Past-the-Post Impact: RJD's Vote Share Higher, Yet BJP Won

Web Summary : Despite RJD securing a higher vote share (22.76%) than BJP (20.90%) in Bihar elections, BJP won more seats due to the First-Past-the-Post system. 'NOTA' option saw a slight increase this election, reaching 1.81% of total votes.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJanta Dal Unitedजनता दल युनायटेड