शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

....तर तलाठ्यांवर शेतकर्‍यांकडून होतील हल्ले .....सेंट्रल डेस्कसाठी

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

महसूलचे हत्यार : १२ हजार तलाठी, २५०० अधिकारी आजपासून संपावर

महसूलचे हत्यार : १२ हजार तलाठी, २५०० अधिकारी आजपासून संपावर
औरंगाबाद : शेतकर्‍यांना ऑनलाईन सातबारा देणे, त्यांच्या पीक कर्जाच्या बोजांची नोंद घेणे, खातेफोड करण्याची कामे वेळेत होत नसल्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांचा उद्रेक झाल्यास ते सर्वप्रथम तलाठ्यांवर हल्ले करतील, अशी भीती राज्य तलाठी- पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
विविध मागण्यांसाठी महासंघाने २६ एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला असून, राज्यात ३ हजार ८४ स. जा. वाढविणे, ऑनलाईन सातबारा योजनेतील सॉफ्टवेअर बदलण्यासह तलाठ्यांना पायाभूत सुविधा पुरविणे, तलाठी कार्यालय बांधणे, या तीन मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या तरच संप मागे घेण्याचा विचार होईल, असेही कोकाटे, डुबल यांनी स्पष्ट केले. १२ हजार ६३७ तलाठी आणि २१०० मंडळाधिकारी, ४०० नायब तहसीलदार संपात सहभागी होणार आहेत. पाणीपुरवठा आणि चारा छावण्यांची जबाबदारी असलेले तलाठी या संपातून वगळण्यात आल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
ऑनलाईन सातबारा देण्यासाठी सुविधा नाहीत. १ एप्रिलपर्यंत पूर्ण राज्यात ऑनलाईन सातबारा करण्याची मुदत होती. राज्यात ३५८ पैकी २१६ तालुक्यांत सातबाराचे काम ऑनलाईन झाले आहे. ३६ तालुके बाकी आहेत. एनआयसीकडे स्पेस नसल्यामुळे त्यांनी खातेदारांच्या सीडी अपलोड केल्या नाहीत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सातबारा ऑनलाईन करण्याचे काम ठप्प आहे. त्याला कारण म्हणजे सुविधा दिल्या जात नाहीत, असे कोकाटे म्हणाले. या पत्रकार परिषदेला सरचिटणीस सतीश तुपे, तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी, रिता पुरी आदींची उपस्थिती होती.
प्रधान सचिवांनी केली विनवणी
प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी फ ोनवरून महासंघाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून संप मागे घेण्याबाबत विनंती केली. महासंघाकडून कोकाटे यांनी श्रीवास्तव यांना तलाठ्यांना काम करण्यात येणार्‍या अडचणींची माहिती देऊन ४ वर्षांपासून सुरू असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेची मागणी केली. एनआयसी ही संस्था सरकारला जुमानत नाही, स. जा. वाढविले तरी कर्मचारी भरतीचा विचार सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन केला जाईल. राज्यभर तलाठ्यांवर हल्ले होत आहेत. त्यांना जाळण्याची भाषा केली जात आहे. ग्रामविकास, विक्रीकर विभागातील पदे भरली जातात. मग महसूलमध्येच भरती का होत नाही. ११६ कोटी रुपयांचा खर्च वाढीव सजांवर होणार आहे. त्या तुलनेत तिप्पट महसूलदेखील मिळणार आहे. अशा प्रकारची चर्चा प्रधान सचिव आणि महासंघ पदाधिकार्‍यांमध्ये झाली.
(जोड आहे)