पट्टी निघाली अन् पितळ उघडं पडलं! बंगाल हिंसाचाराच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' VIDEO चं सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:58 IST2026-05-07T13:49:02+5:302026-05-07T13:58:06+5:30

पश्चिम बंगालच्या हिंसाचाराच्या नावाखाली एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fact Check Viral Video of Woman Faking Injury is from Bihar Not West Bengal Post Poll Violence | पट्टी निघाली अन् पितळ उघडं पडलं! बंगाल हिंसाचाराच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' VIDEO चं सत्य समोर

पट्टी निघाली अन् पितळ उघडं पडलं! बंगाल हिंसाचाराच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' VIDEO चं सत्य समोर

Fake TMC Worker Caught Faking an Injury: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पराभवानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजपने २०० पेक्षा जास्त जागा जिंकत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव केला ज्यामुळे राज्यात हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून या हिंसाचाराच चौघांचा मृत्यू झाला. तृणमूलच्या अनेक कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच बंगालमधील हिंसाचारामुळे जखमी झालेल्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल केला जात असून ज्यात त्या महिलेचे पितळ उघडं पडल्याचे दिसत आहे. मात्र तपासानंतर हा व्हिडीओ तिथला नसल्याचे समोर आलं आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच वातावरणात सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला डोक्याला पट्टी बांधून माध्यमांशी बोलताना दिसते, पण अचानक एक महिला तिच्या डोक्यावरची पट्टी ओढते आणि तिची खोटी इजा कॅमेऱ्यासमोर येते. ही महिला तृणमूल काँग्रेसची कार्यकर्ती असून तिने ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे खोट्या जखमेचे नाटक केले असा दावा करण्यात येत होता.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

व्हायरल क्लिपमध्ये एक महिला पत्रकारांशी संवाद साधत असताना रडताना दिसते. तेवढ्यात मागून एक महिला येते आणि तिच्या डोक्यावरची पट्टी खेचते. पट्टी निघताच तिथे कोणतीही जखम नसल्याचे दिसते, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये राडा सुरू होतो. अनेक माध्यमांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडिओ बंगालमधील तृणमूल कार्यकर्त्याचा खोटा दावा असे म्हणून शेअर केला होता.

या व्हिडिओची तपासणी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील नसून बिहारमधील आहे. हा व्हिडिओ बिहारच्या मुजफ्फरपूरमधील श्री कृष्ण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल इथला आहे. ही घटना २८ एप्रिल २०२५ रोजी घडली होती. हॉस्पिटलमधील ट्रॉली ओढणारे कामगार आणि रुग्ण यांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला होता. एका महिला कर्मचाऱ्याने आरोप केला होता की तिला मारहाण झाली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी कॅमेऱ्यासमोरच तिची बनावट पट्टी काढून तिचा खोटेपणा उघड केला.

हा व्हिडीओ २८ एप्रिलचा आहे, तर बंगाल निवडणुकीचे निकाल मे महिन्यात लागले. म्हणजेच, बंगालमधील हिंसाचाराशी या व्हिडिओचा कुठेही संबंध नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील राजकीय वादाचा भाग नसल्याचे समोर आलं आहे.

Web Title : बंगाल हिंसा पर वायरल वीडियो बिहार का है, बंगाल का नहीं।

Web Summary : बंगाल हिंसा से जुड़ा एक वायरल वीडियो, जिसमें एक महिला चोट का नाटक कर रही है, वास्तव में बिहार की 2025 की घटना का है। अस्पताल में एक नकली चोट के दावे को पश्चिम बंगाल में चुनाव के बाद अशांति के लिए गलत तरीके से जिम्मेदार ठहराया गया था।

Web Title : Viral video on Bengal violence is from Bihar, not West Bengal.

Web Summary : A video falsely linked to Bengal violence, showing a woman feigning injury, is actually from a 2025 incident in Bihar. The footage, depicting a staged injury claim at a hospital, was falsely attributed to post-election unrest in West Bengal.